गावगाथा

तरुणांनी गावच्या विकासाचा ध्यास नागरिकांच्या मनोमन पेरावा…… गोविंद पाटील

नाईक नगर, ता. उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या उद्घाटन संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाडाला आळे व पाणी घालून करताना बापूराव पाटील, रचना राठोड, मदन पाटील, गोविंद पाटील, व्यंकटराव जाधव गुरुजी, माणिक राठोड, योगेश राठोड, अशोक सपाटे, व अन्य.

तरुणांनी गावच्या विकासाचा ध्यास नागरिकांच्या मनोमन पेरावा…… गोविंद पाटील

मुरुम, ता. उमरगा, ता. ९ (प्रतिनिधी) : भारताला समृद्ध करण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन, ग्रामस्वच्छता, जलव्यवस्थापन या गोष्टींचे संवर्धन करणे आणि राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी तरुणांनी गावच्या विकासाचा ध्यास नागरिकांच्या मनोमन पेरावा असे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी उपसभापती गोविंद पाटील यांनी केले. नाईक नगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘ युवकांचा ध्यास ग्रामविकास व बालविवाह जनजागृती ‘ या शीर्षकाखाली वार्षिक विशेष शिबिराप्रसंगी शुक्रवारी (ता. ९) रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रचना राठोड होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. या वेळी विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे संचालक माणिकराव राठोड, उमरगा-लोहारा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश राठोड, मुरूमचे माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, माजी उपसभापती गोविंद पाटील, विकासेसोचे माजी चेअरमन दत्ता चटगे, सरपंच रितेश जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव महालिंगप्पा बाबशेट्टी, सुजित शेळके, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्राचार्य रमेश जाधव, मुख्याध्यापक गोविंद चव्हाण, उपसरपंच वालचंद राठोड, ग्रामपंचायत सदस्य अरुण राठोड, अशोक राठोड, ग्रामसेवक सचिन डावरे, मार्केट कमिटीचे संचालक सोनकटाळे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना गोविंद पाटील म्हणाले की, सध्या नागरिकांसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानावर मात करण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी पाण्याची बचत करणे, परिसर स्वच्छता, आरोग्याची काळजी घेणे, वाढती व्यसनाधीनता आणि मोबाईलचा अतिरेकी वापर टाळणे गरजेचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शारीरिक दृष्टया तंदुरुस्त बनुन मानसिक दृष्टया सक्षम बनविणे गरजेचे असल्याचे शेवटी ते म्हणाले. डॉ. अशोक सपाटे, योगेश राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिला स्वामी, डॉ. रविंद्र आळंगे, डॉ. महेश मोटे, डॉ. राम बजगिरे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. विलास खडके, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. अजिंक्य राठोड, विद्यार्थी प्रतिनिधी ओमकार चव्हाण, मनोज हावळे, अमोल कटके, श्रावण कोकणे आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशोक बावगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते.                 

  फोटो ओळ : नाईक नगर, ता. उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या उद्घाटन संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाडाला आळे व पाणी घालून करताना बापूराव पाटील, रचना राठोड, मदन पाटील, गोविंद पाटील, व्यंकटराव जाधव गुरुजी, माणिक राठोड, योगेश राठोड, अशोक सपाटे, व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button