एस.एस.सी.च्या यशात आई-वडीलांचे मार्गदर्शन व श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद मोलाचे – कु.सेजल जाधव
तालुक्यातील गुणवंत विद्यार्थिनी सेजल जाधव हिचा वटवृक्ष मंदीरात महेश इंगळेंच्या हस्ते सन्मान.
(श्रीशैल गवंडी, अकोट. दि.३१/५/२०२५)
एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत आई-वडिलांचे मार्गदर्शन व श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद मोलाचे ठरले असल्याचे मनोगत मार्च २०२५ मध्ये पुणे बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या एसएससी बोर्ड परीक्षेतील तालुक्यातून तृतीय क्रमांकाने व आय.एम. एस.शाळेतून ९८.२०% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली गुणवंत विद्यार्थिनी कु.सेजल जाधव हिने व्यक्त केले. आज कु. सेजल जाधवच्या या उज्वल याच्याबद्दल येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी सेजल जाधव, तिचे आई वडील अर्चना जाधव, संतोष जाधव यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना सेजल जाधव हिने आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना सेजल जाधव या विद्यार्थिनीने माझे आई-वडील, शिक्षक शिक्षिका असल्याने घरात मुळातच बालपणापासून शैक्षणिक वातावरण रूजलेले आहे माझे वडील संतोष जाधव हे फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी व सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आहेत. त्यामुळे बालपणापासूनच शालेय जीवनात आई-वडिलांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने शैक्षणिक जनगणनाची वाटचाल योग्य दिशेने जाऊन एसएससी बोर्डातील परीक्षेत हे यश संपादन करता आले आहे, तसेच या यशात आई-वडिलांच्या मार्गदर्शनामुफळे अथक परिश्रम करून अभ्यास करण्याची जिद्द बळावली होती. या सोबतच श्री स्वामी समर्थांचे नियमितपणे नामस्मरण करणे, वारंवार वटवृक्ष मंदिरात येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणे, यामुळेही स्वामी समर्थांचे आशीर्वाद या यशात नक्कीच सामावले असल्याचे भावोद्गार व्यक्त केले. कु. सेजल जाधवच्या या उज्वल यशाबद्दल तालुक्यातील सर्व स्तरातून तिच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संतोष जाधव, अर्चना जाधव, समर्थ जाधव व कुटुंबीय, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – कु.सेजल जाधव, अर्चना संतोष जाधव यांचा सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!