पंढरीची वारी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक – महेश इंगळे
महेश इंगळेंच्या हस्ते आरती होऊन अक्कलकोट ते पंढरपूर दिंडीचे प्रस्थान

पंढरीची वारी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक – महेश इंगळे

महेश इंगळेंच्या हस्ते आरती होऊन अक्कलकोट ते पंढरपूर दिंडीचे प्रस्थान

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१४/२/२४) –


(श्रीशैल गवंडी) – मानवी जीवनात कोणत्याही संपत्तीपेक्षा भावभक्तीची संपत्ती ही अमुल्य असून ईश्वर स्मरणात जीवन व्यतीत करणाऱ्या भाविकांना ही संपत्ती लाभत असते, त्यामुळे पंढरीस जाणारा वारकरी हा खऱ्या अर्थाने या भक्ती संपत्तीचा उपभोक्ता असून पंढरीच्या वारीतच जीवनाची सार्थकता असल्याने सर्व जाती धर्माचे लोक या वारीत गुण्यागोविंदाने एकत्र येतात, त्यामुळे पंढरीची वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक तथा वारकरी सांप्रदायचे तालुका अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले.
सालाबादप्रमाणे यंदाही तीर्थक्षेत्र अक्कलकोट ते तीर्थक्षेत्र पंढरपूर पायी माघवारी दिंडीचे प्रस्थान महेश इंगळे
यांच्या हस्ते दिंडी पूजनाने झाली.
याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते.
गेल्या ३५ वर्षांपासून अक्कलकोट ते पंढरपूर पायी दिंडी वारी कै.बाळासाहेब इंगळे यांच्या प्रेरणेने चालू आहे. याचा वारसा वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी मोठ्या उत्साहाने चालू ठेवला आहे असे मनोगत मंदिर समितीचे विश्वस्त संपतराव शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, दिंडी चालक व प्रमुख श्रीमुख जगदाळे, मंदार महाराज, दिंडी उपाध्यक्ष मदन होटकर, बाबू पांचाळ, धनू पाटील,
मल्लिनाथ मुक्ता, राजू आवले, अविनाश जाधव, अंगद आवले, रामतीर्थ, मधुकर गिरी महाराज, शिवाजी केदारे, नामदेव औढा, हरिदास मुळे, अनंत पाटील, मुरलीधर पाटील, मुक्ताबाई मदने, अनुसया ढगे-पाटील, मंगलबाई जाधव, नंदा पाटील, धोंडीराम पाटील, चंद्रकांत गवळी, करण पाटील, सदानंद जाधव, अनंत पाटील, अप्पाराव पाटील, धोंडीराम पाटील, व्यंकट पाटील, भास्कर आबा, मधु महाराज,
स्वप्निल सातपुते, सुनिल कटारे, सुनिल पवार, दिपक पवार, नंदकुमार जगदाळे, शिवाजी केदारे, पांडूरंग शिंदे, नरसिंग क्षीरसागर, हारीमुळे, सहू, मदनेबाई, अनुसया पाटील, चंद्रकला माळी, जयदेव सुर्यवंशी, धनराज पाटील, बोदले यलगेरी, प्रसाद सोनार, मोहन शिंदे, संजय पाठक, संतोष पराणे, मंदिर समितीचे सचिव प्रा.शिवशरण अचलेर, गिरीश पवार, सागर गोंडाळ, संजय पवार, श्रीशैल गवंडी, महेश मस्कले, श्रीपाद सरदेशमुख आदिंसह हजारो भाविक उपस्थित होते.

फोटो ओळ – अक्कलकोट ते पंढरपूर माघवारी पायी दिंडीचे पूजन करून दिंडी प्रस्थान प्रसंगी महेश इंगळे, व्यंकटेश महाराज पुजारी, व इतर भाविक भक्त दिसत आहेत.