नविन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणार आहे. : माधवराव पाटील महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डाॅ. शिला स्वामी
परिषद यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा. विलास अंधारे, डाॅ. गणपतराव कलशेट्टी, डाॅ. अंकुश शिंदे, डाॅ. अप्पासाहेब देशमुख,डाॅ. भैरप्पा कोणदे, डाॅ. लता हिंडोळे व प्रा. विकास भारतीय व शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.

नविन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणार आहे. : माधवराव पाटील महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डाॅ. शिला स्वामी

अक्कलकोट, दि.१५- नविन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार असल्याचे प्रतिपादन मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डाॅ. शिला स्वामी यांनी केले.

येथील सी.बी. खेडगी महाविद्यालयात एक दिवसीय राज्यस्तरीय सामाजिक शास्त्र विद्यार्थी परिषदेच्या समारोप समारंभात डॉ. स्वामी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट हे होते.

दिवसभर चार सत्रात आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून सुमारे १३५ विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४० विद्यार्थ्यांनी त्यांच्या शोध निबंधाचे वाचन केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आडवितोट यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनात झोकून काम केले पाहिजे. त्यामुळे भारत प्रगतीपथावर जाईल, असे मत व्यक्त केले.

समारोप कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट शोधनिबंध सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. शोधनिबंध परिक्षणाच काम बुर्ला महाविद्यालयातील
डाॅ. सोनाली गिरी, प्रा. डी. एन. लिगाडे, प्रा. प्राची काटे, प्रा.व्ही.व्ही. खडके व डाॅ. राहुल परदेशी यांनी पाहीले. सुत्रसंचालन प्रा. संध्या इंगळे यांनी तर आभारप्रदर्शन डाॅ.किशोर थोरे यांनी केले.