अक्कलकोट आझाद गल्लीतील श्री अक्कमहादेवी प्रतिष्ठापनाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त शिवशरणी हेमरेड्डी मल्लमा यांच्या जीवन चरित्रावरील पुराण प्रवचनाचा शुभारंभ
हुबळी मठाचे मठाधिपती श्री.ष.ब्र.राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या रसाळ वाणीने सुरू

अक्कलकोट आझाद गल्लीतील श्री अक्कमहादेवी प्रतिष्ठापनाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त शिवशरणी हेमरेड्डी मल्लमा यांच्या जीवन चरित्रावरील पुराण प्रवचनाचा शुभारंभ

दि. १५- येथील आझाद गल्लीतील
श्री अक्कमहादेवी प्रतिष्ठापनाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित हुबळी मठाचे मठाधिपती
श्री.ष.ब्र.राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या रसाळ वाणीने सुरू होणाऱ्या
शिवशरणी हेमरेड्डी मल्लमा यांच्या जीवन चरित्रावरील पुराण प्रवचनाचा शुभारंभ वीरशैव लिंगायत विरक्त मठाचे मठाधिपती श्री.म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक मल्लिनाथ स्वामी, ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर चे अध्यक्ष शिवलिंगय्या स्वामी, सुर्यकांत बिराजदार, मल्लमा पसारे, वैशाली लोकापुरे, शिवशरण स्वामी, ज्ञानेश्वर बेळकोटा, अक्कमहादेवी मंदिराचे अध्यक्ष अध्यक्ष श्रीशैल भरमशेट्टी, उपाध्यक्ष शिवशंकर चनशट्टी, सचिव लक्ष्मण समाणे, विश्र्वस्त शिवशरण बिंदगे, सुभाष अंदोडगी, देविदास कवटगी, बसवराज इचगे, संतोष लंगोटे, रविंद्र बंकापूरे, नारायण कदम, बसवराज स्वामी, राजकुमार कांदे, गुरुनाथ धरणे, बाबुराव मंगरूळे, सिध्दाराम स्थावरमठ, शिवु मंगरूळे ,विनायक तारापुरे, सचिन स्वामी, इरय्या स्वामी,विजय कोळ्ळे उपस्थित होते.

शुभारंभ प्रसंगी प्रवचनकार श्री राजशेखर महास्वामीजी बोलताना म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या जीवनात भाविकांना सुख आणि समाधान मिळणे अवघड झाले आहे. यासाठी भाविकांनी सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन मन प्रसन्न करणे आवश्यक आहे. यातूनच मनस्वी आनंद व्दिगुणित होते. मन आनंदाने भरून काढण्यासाठी काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे असले तरी सुद्धा परमेश्वराचे नामस्मरण करत रहावे. शांत निवांत क्षणी परमेश्वराचे नामस्मरण करत राहिले तर प्रपंचात यशस्वी होण्यासाठी वेळ लागणार नसल्याचे सांगितले.

शुभारंभ प्रसंगी श्री बसवलिंग महास्वामीजी यांनी उपस्थित भाविकांना दररोज विभूती लावण्यासाठी आणि लिंग पूजा करण्यासाठी सांगितले.

यावेळी
श्री रेणुकाचार्य अक्कनबळग भजन मंडळ आझाद गल्ली, माताभगिनी तसेच समस्त आझाद गल्ली, माळी गल्ली,बसवेश्वर नगर,राजीव नगर, शिवसम्राट चौक व परिसरातील सर्व सदभक्त वृंद उपस्थित होते.