कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात संत सेवालाल महाराज जयंती साजरी..
जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी व संचालक मल्लिनाथ मसुती यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240215-WA0052-780x470.jpg)
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात संत सेवालाल महाराज जयंती साजरी..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट: महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सौ. सुरेखा कल्याणशेट्टी मराठी, कन्नड व सेमी इंग्रजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गिरजामाता मराठी व सेमी इंग्रजी प्राथमिक विद्यालय, नालंदा विद्यार्थी वसतीगृह यांच्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेने जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी व संचालक मल्लिनाथ मसुती
यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक राजशेखर पवार यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. या कार्यक्रमास संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संस्थेच्या सीईओ रूपाली शहा, ज्युनियर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे,प्राथमिक मुख्याध्यापक सुरेश आवटे, खंडेराव घाटगे,सेमीचे निखील भालेराव, सर्व प्राध्यापक, शिक्षक , कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)