कल्याणशेट्टी शिक्षण संकुलनात छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमानी साजरी..
प्रा राजशेखर पवार, रविकिरण दंतकाळे, सिद्रामप्पा पाटील,प्रकाश पाटील, जयप्रकाश गुरव, प्रतिभा माने,नीशिगंधा कोळी,मनीषा शिंदे,विद्याश्री बिराजदार,प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलनात छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमानी साजरी..

अक्कलकोट: महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या सौ. सुरेखा कल्याणशेट्टी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय ,मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालय,गिरीजामाता मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय, नालंदा विद्यार्थी वसतिगृह , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र यांच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी व अनंत चैतन्य प्रशालेचे मुख्याध्यापक विलास बिराजदार यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी संस्थेच्या सीईओ सौ रुपाली शहा ज्युनियर विभाग प्रमुख सौ पुनम कोकळगी संचालक मल्लिकार्जुन मसुती हे उपस्थित होते. यावेळी कुमारी श्रद्धा बाबर हिने शिवगर्जना सादर केली तर श्रेया बुधवंत, वर्षा बेळ्ळे,आल्फिया शेख, आलीया वळसंगकर,गायत्री जमादार, भक्ती मोरडे,ईश्वरी सोमेश्वर,निकत शिकलगार, आयशा शेख,अमृता घोडके, श्रुती बुधवंत, बानू देडे,दिव्या बंदिंछोडे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट भाषणे तसेच अक्षता साठे, स्नेहा देडे,संस्कृती क्षीरसागर, अंतरा चौघुले व धानेश्वरी घंटे या विदयार्थ्यांनी पोवाडा सादर केला. विद्यार्थ्यांनी शिवकालीन पेहराव केला होता. तसेच खंडेराव घाटगे व कल्पना स्वामी यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी
प्रा राजशेखर पवार, रविकिरण दंतकाळे, सिद्रामप्पा पाटील,प्रकाश पाटील, जयप्रकाश गुरव,
प्रतिभा माने,नीशिगंधा कोळी,मनीषा शिंदे,विद्याश्री बिराजदार,प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
