गावगाथा

बासलेगाव येथे श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा भक्तिभावात संपन्न

धार्मिक कार्यक्रम

 

HTML img Tag Simply Easy Learning    

बासलेगाव येथे श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा भक्तिभावात संपन्न

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
तालुक्यातील श्री क्षेत्र बासलेगाव येथे श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा डॉ. श्री शिवाचार्यरत्न जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला.

HTML img Tag Simply Easy Learning    

या वेळी श्री. ष.ब्र. बसवलिंग महास्वामीजी (नागणसूर तुप्पीन मठ), श्री. ष.ब्र. मारुलाराध्य शिवाचार्य महास्वामीजी (माशाळ), श्री. ष.ब्र. बसवलिंग महास्वामीजी (विरक्त मठ, अक्कलकोट) तसेच वे. पं. सोमनाथ स्वामी धोत्री हे प्रमुख उपस्थित होते. श्री जगदंबा देवीचे या भागात विशेष महात्म्य असल्याने भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.

HTML img Tag Simply Easy Learning    

प्राणप्रतिष्ठा निमित्त श्री लक्ष्मी मंदिर येथून देवीच्या डोंगरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. रात्री भजन, जागरण, पारंपरिक ढोल-वाद्यांसह धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. डोंगरावरील श्री जगदंबा देवी मंदिरातून गावातील प्रमुख मार्गावरून जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ३०० सुहासिनी महिलांचा सहभाग होता.

HTML img Tag Simply Easy Learning    

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व साडेतीन शक्तीपीठांवरील अध्यात्मिक प्रवचनाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. जमखंडी येथील हलता देखावा हा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. बंजारा समाजातील महिला पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

या सोहळ्यास रेऊर (जि. गुलबर्गा) येथील माजी आमदार दत्ता उर्फ अप्पू गौडा पाटील व त्यांची पत्नी लक्ष्मीताई पाटील, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, भाजपा युवा नेते मिलन कल्याणशेट्टी तसेच नवी मुंबईचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

मुख्य प्राणप्रतिष्ठा विधी, अभिषेक, जलकुंभ व महाआरती हे सर्व धार्मिक विधी श्री जगदंबा देवी ट्रस्टचे मुख्य पुजारी श्रीराम देशपांडे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी नवी मुंबई वाशी मार्केट येथील माथाडी कामगारही कुटुंबासह उपस्थित राहून देवीचरणी सेवा अर्पण केली.

हा भव्य धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी बासलेगावातील सर्व ग्रामस्थ तसेच श्री जगदंबा देवी संस्थानचे विश्वस्त व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. तालुक्यातील विविध गावांतील देवी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button