गावगाथा

*अक्कलकोट येथे संत शिरोमणी रोहिदास जयंती मोठ्या उत्सवात साजरी*

रविदास महाराज जयंती विशेष २०२४

*अक्कलकोट येथे संत शिरोमणी रोहिदास जयंती मोठ्या उत्सवात साजरी*

अक्कलकोट येथील नरसिंह मंदिर हरवाळकर गल्ली येथे संत रोहिदास महाराज यांच्या ६४७ वी जयंतीचे औचित्य साधुन सर्व चर्मकार समाज बांधवांच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून श्रीफळ फोडून दिपप्रज्वलीत करून प्रातिमेचे पूजन करण्यात आले तसेच संत रोहिदास महाराज यांच्या कार्याचे माहिती समजून घेण्यात आली .
संत रोहिदास यांचा जन्म सुमारे इ.स. १४५० मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. त्यांनी कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्यांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत.
संत रोहिदास इ.स. १५ ते १६ व्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यंवादी कवी होते. रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ति चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरू (शिक्षक) म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. ते कवी-संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते. अश्या ऐकणा अनेक कार्याची माहिती घेण्यात आली या प्रसंगी चर्मकार समाजाचे अध्यक्ष अंबरीश हरवाळकर जेष्ठ पत्रकार स्वामीनाथ हरवाळकर जेष्ठ शिक्षक आनंद खजुर्गीकर सर दत्ता हरपाळकर आनंद हरवाळकर प्रशांत महाजन दशरथ हरवाळकर संजय मानकर अशोक हरवाळकर गुरणा हरवाळकर राजु हरवाळकर राहुल वंजारी सिद्धांत हरवाळकर शिवानंद माशाळकर समर्थ बमनाळीकर आकाश माशाळकर अक्षय बमनाळीकर दिपक हरवाळकर ओंकार बमनाळीकर अमोल हरवाळकर आदी समाज बांधव उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button