गावगाथा

*अभूतपूर्व जल्लोषात वागदरी येथे रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.*

शिवजयंती उत्सव विशेष २०२४

*अभूतपूर्व जल्लोषात वागदरी येथे रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.*

HTML img Tag Simply Easy Learning    

वागदरी — अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये अभेद्य असे रयतेचे राज्य निर्माण करणारे श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध सामाजिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी १९ फेब्रुवारी या शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी महाराजांच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढून श्री.परमेश्वर मंदिरासमोर प्रतिष्ठापना करण्यात आले.या वेळेला शिव बसव चौक एस. टी.स्टँड वागदरी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या तैल चित्रांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.शिवजयंती निमित्त संपूर्ण बाजारपेठेमध्ये भगवे झेंडे लावण्यात आले होते व लाईटचे माळाने सजवण्यात आले होते.सायंकाळी ७.०० वाजता बाळ शिवरायांचा पाळणा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी आपल्या गावातील असंख्य महिला मंडळी बाल गोपाळ उपस्थित होते.पाच दिवस दररोज वागदरी व वागदरी पंचक्रोशीतील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आले.
दिनांक २२फेब्रुवारी २०२४ वार गुरुवार या दिवशी रात्री ठीक आठ वाजता नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध लोकगीत गायिका सौ.चंद्रभागाताई मेटकर व त्यांचे सहकारी कलावंत मंडळी श्री.शिव पार्वती संगीत संच वारकवाडी यांचे गायनाचा कार्यक्रम पार पडला .या कार्यक्रमास आपल्या गावातील व वागदरी पंचक्रोशीतील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.दिनांक २३.०२.२०२४ वार शुक्रवार या दिवशी सायंकाळी ठीक ६.००वाजता श्री.छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आले व त्यानंतर महाराजांच्या भव्य अश्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले.या मिरवणुकीतील महत्वाचे आकर्षण होते ते म्हणजे नुकतेच महाराष्ट्र शासनाने जो महाराष्ट्राचा मर्दानी खेळ म्हणून दर्जा दिलेला आहे असा दांडपट्टा.हा दांडपट्टा खेळ सादर करण्यासाठी सातारा जिल्ह्यातून खेळाडू आले होते.त्यांनी आपल्या उत्तम कौशल्यपूर्ण खेळातून आपल्या अख्या गावाला त्यांच्या भोवती खिळउन ठेवले. डीजे च्या तालावर नाचणारी तरुणाई हा जेव्हा खेळ सुरू झाला ,तेव्हा त्यांचे नाचणे आपोआप बंद झाले आणि ती संपूर्ण तरुणाई या शिवकालीन दांडपट्टा या मर्दानी खेळाभोवती शेवट पर्यंत खिळून राहिली.महाराजांची मिरवणूक जेव्हा चावडी या आपल्या गावातील मध्यवर्ती ठिकाणी गेली तेव्हा दांडपट्टा या मर्दानी खेळाने परमोच्च शिखर गाठला.या खेळाडूंनी आपल्या साहसी,धाडसी खेळाची अनेक प्रकारचे प्रात्यक्षिके करून दाखवले,शिवकाळातील मावळ्यांची लढाई आपण प्रत्यक्षात पाहतोय हा भास निर्माण झाला.अंगावर शहारे आणणारे अनेक रोमांचकारी शिवकालीन लढाईची प्रात्यक्षिके त्यांनी करून दाखवले.हा खेळ पाहण्यासाठी चावडी मध्ये आपल्या पर्व प्रमाणे गर्दी झाली होती.अबाल वृद्ध,महिला भगिनी ,तरुण मंडळींनी या खेळाचा आस्वाद घेतला. मिरवणुकी वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.आपल्या श्री.परमेश्वर मंदिरासमोर रात्री ठीक दहा वाजता महाराजांची पूजा करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.यावेळी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली.
शिवजन्मोत्सव सोहळा व्यवस्थित पार पडण्यासाठी श्री.शिवाजी महाराज जन्मोत्सव कार्यकारिणी २०२४अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव,खजिनदार यांच्या सह असंख्य समाज बांधव,गावातील युवा बांधव,छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ चे कार्यकर्ते यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन उत्तम रीतीने पार पाडला.हा सोहळा यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मनापासून सहकार्य केले त्यांचे शिवजन्मोत्सव मंडळ मनापासून ऋणी आहे 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button