
अनंत चैतन्य प्रशालेत ” जागतिक योग दिवस ” उत्साहात साजरा —
———————————– २१ जुन २०२४ रोजी महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तसेच सेमी इंग्रजी प्राथमिक विद्यालय,हन्नूर येथे दहावा ” आतंरराष्ट्रीय योग दिवस” अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अशोक साखरे यांच्या हस्ते ” भारतमातेच्या ” प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना योगासनांचे
महत्व पटवून देऊन “योग शिबीरास” सुरुवात करण्यात आले.प्रशालेचे योगशिक्षक श्री. शहाजी माने यांनी “योग व प्राणायाम”चे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकरवी सराव करवून घेतले.व योगायोगाने आजच ” वटपौर्णिमेचा” सण आल्याने त्याचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सरांना वृक्षारोपण व संवर्धन याची खुप आवड होती. यामुळे काळाची गरज ओळखून विद्यमान अध्यक्ष व आमदार मा. सचिनदादा कल्याणशेट्टी यांनीही ” वृक्षसंवर्धनाच्या उद्देशाने संस्थेच्यावतीने प्रशालेतील समस्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना आपापल्या शेतात किंवा घरासमोर किमान एक तरी झाड लावावे याकरिता वेगवेगळ्या झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.व यानंतर प्रशालेच्या परिसरातही प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ सन्माननिय श्री. सिध्देश्वर कल्याणशेट्टी सरांच्या हस्ते “वृक्षारोपण ” करण्यात आले. आजच्या ” योग शिबीर, वृक्षारोपण व वृक्षरोपवाटप” अशा या संयुक्त कार्यक्रमाचे संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक मा. श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संस्थेच्या संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूर चे उपसरपंच व युवा नेते मा. श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती, शिक्षण विभाग प्रमुख सौ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी कौतुक करून अभिनंदन केले. या कार्यक्रमास सेमी व प्रशालेचे समस्त शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
