आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाला यश; अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकार समितीकडून गुरुवारी हिरवा कंदील देण्यात आले.
गेल्यान अनेक वर्षापासून राज्यातील अन्य तीर्थक्षेत्रात विकासाच्या बाबतीत मागे असलेल्या श्रीक्षेत्र अक्कलकोटचा चेहरा मोहरा बदण्यास मोठी तरतूद होणार

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाला यश; अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकार समितीकडून गुरुवारी हिरवा कंदील देण्यात आले.

अक्कलकोट, दि.16 : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाला यश; अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकार समितीकडून गुरुवारी हिरवा कंदील देण्यात आल्याने गेल्यान अनेक वर्षापासून राज्यातील अन्य तीर्थक्षेत्रात विकासाच्या बाबतीत मागे असलेल्या श्रीक्षेत्र अक्कलकोटचा चेहरा मोहरा बदण्यास मोठी तरतूद होणार असल्याच स्पष्ट झालेले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीकडे मान्यतेकरिता लवकरच सादर केला जाणार ओ. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सदरचा विषय लावून धरलेले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
गुरुवारी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनात दुपारच्या दरम्यान उच्चाधिकारी समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबाबतची सकारात्मक चर्चा संपन्न झाली. या बैठकीचे मिनीटस्ह आराखडा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात येणार आहे.
या बैठकीस सहसचिव राजेंद्र क्षीरसागर, वित्त विभागाचे सचिव ओमप्रकाश गुप्ता, नियोजन विभागाचे राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिवराव साळुंखे (रस्ते), नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुध्द जवळीकर, जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूरचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूरचे कार्यकारी अभियंता उमाकांत माशाळे, नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी विलासराव धाईंजे (नवि-18), अक्कलकोट न.प.चे मुख्याधिकारी सचिन पाटील, विद्युत वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे, न.प.अक्कलकोटचे मलिक बागवान, आदीजण उपस्थित होते.
दरम्यान राज्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करणे, याबाबत नियोजन विभागाने दि.4 जून 2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित केले असून नागरी भागातील तीर्थक्षेत्र आराखडे नगर विकास विभागाने करण्याचे निर्देशित आहे. सदर शासन निर्णयानुसार आराखडा तयार करण्यासाठी जिल्हास्तराव जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
सदर समितीने शिफारस केल्यानंतर प्रस्तावाची छाननी करुन मुख्यमंत्री यांच्या शिखर समितीकडे शिफारस करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे.
यापूर्वी श्रीक्षेत्र अक्कलकोटचा सन 2018 मध्ये रु.166.79 कोटीचा आराखडा उपरोक्त समितीने शासनास सादर केला होता. सदर आराखड्यास मान्यता मिळण्यासाठी नगर विकास विभागाने उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी प्रकरण सादर केले होते, तथापि तत्कालीन परिस्थितीत बैठक झाली नाही. याअगोदर नगर विकास विभाग मंत्रालयाने अक्कलकोट नगरपरिषदेस विकास कामासाठी आतापर्यंत रु.20 कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिले होते. दरम्यान जिल्हाधिकारी सोलापूर यांना मुख्य सचिव यांच्याकडे आयोजित बैठकीचे सादरीकरण करण्याचे या विभागाकडून कळविण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांनी सन 2017-18 पासून विकास कामाच्या अंदाजित किंमतीमध्ये दरसूचीनुसार प्रतीवर्षी वाढ विचारात घेवून सन 2022-23 च्या दरसुचीनुसार 368.71 कोटी रक्कमेचा आराखड सादर केला आहे. आराखड्यामध्ये एकूण 8 बाबींसाठी 42 कामे प्रस्तावित केली आहेत.

आराखड्यासाठी आवश्यक निधी :
वाहतनळांचा विकास – वाहनतळ, वॉटर एटीएम व भूसंपादन रु.43.45 कोटी, रस्ते विकास – रस्ते विकास व भूसंपादन 214.50 कोटी, शौचालय बांधकाम – सुलभ शौचालय निर्मिती 4.50 कोटी, पाणीपुरवठा व यंत्र खरेदी – पाणीपुरवठा व नाला बांधकाम 53 कोटी, उद्यानांचा विकास – हत्ती तलाव व उद्यांनाचा विकास 13 कोटी, विद्युतीकरणाची कामे – महावितरणकडील कामे 6.56 कोटी, व्यापारी केंद्र व अनुषंगिक सेवा – व्यापारी केंद्र व भक्त निवास 25.70 कोटी, इतर कामे – चौक सुशोभिकरण 8 कोटी असे एकूण 368.71 कोटी रुपये याकामी लागणार आहेत.

गुरुवार यशदायी :
श्री स्वामी समर्थांचा वार हा ‘गुरुवार’ ओळखला जातो. अनेकजण शुभ वार म्हणून गुरुवार या वाराला महत्व दिले जाते. अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या मंजूरी करिता उच्चाधिकार समितीची बैठक गुरुवारी संपन्न झाली. हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागणार आहे. अनेकजण गुरुवारी या वाराला महत्त्व देत कार्यारंभ करतात. हाच अक्कलकोटकरांना यशदायी ठरला आहे.
