गावगाथा

भाविकांच्या सोईसह वटवृक्ष मंदीराचे उपक्रम उल्लेखनीय विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी 

पो.महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

भाविकांच्या सोईसह वटवृक्ष मंदीराचे उपक्रम उल्लेखनीय विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी 

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.८/३/२४) –
(श्रीशैल गवंडी) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी दर्शनासाठी मंदीरात येणाऱ्या भाविकांकरीता असलेल्या सोई सुविधा या सर्वोत्तम दर्जाच्या असून या सह मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे
सर्व धार्मिक सामाजिक उपक्रम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी
यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी मंदिरातील वटवृक्षाखालील स्वामींच्या अखंड नंदादीप मंदिरास चांदीचे नक्षीकाम नुकतेच करण्यात आले आहे, त्याचा शुभारंभही पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आला व या स्थानाचेही फुलारी यांनी मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी
मंदीर समितीच्या विवीध कार्याचा आढावा घेतल्यानंतर बोलताना पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सोलापूरचे पोलीस अधीक्षक
शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, साऊथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
महेश स्वामी, वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सनगले,
मंदार महाराज पुजारी, गोपनीय खात्याचे धनराज शिंदे, गजानन शिंदे, मंदीर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, संजय पवार, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, विपूल जाधव, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – पो.महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button