लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा अक्कलकोट वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
महिला दिनानिमित्त विशेष

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा अक्कलकोट वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा अक्कलकोट 02 यांचे वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लोकमंगल समृद्ध ग्राम या अभियाना अंतर्गत बासलेगाव तालुका अक्कलकोट येथे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमाची सुरुवात जगतज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमांमध्ये आपल्या लोकमंगल समृद्ध ग्राम योजनेची तसेच महिला सन्मान आवर्तक ठेव योजनेची माहिती ही देण्यात आली.या वेळेस लोकमंगल पतसंस्था चे सल्लागार कु. पसारे मॅडम यांनी महिला दिनानिमत्त मार्गदर्शन केले.
*💐*सत्कार मूर्ती*💐*
१.सौ.सीमा शर्णय्या स्वामी (ग्रामपंचायत सदस्य)
2. सौ. गंगाबाई इरय्या स्वामी (अंगणवाडी सेविका)
3. सौ. धानंमा सिद्धाराम अंटद
(आशा सेविका)
4.सौ.भीमा गौरीशंकर जमादार
(बचत गट लिपिका)
5.सौ.ज्योती उमेश सोडगी
(बचतगट सी.आर.पी)
6. सौ. पूजा बसवराज देखणे (शिवणकाम)
वरील प्रमुख पाहुण्यांचा महिला दिनानिमित्त त्यांच्या विशेष कार्यासाठी भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी फराळ वाटपाचा कार्यक्रम झाला. सदर कार्यक्रमास सरपंच, प्रमुख मान्यवर स्थानिक महिला, विविध संस्थेचे पदाधिकारी लोकमंगल पतसंस्था शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
