गावगाथा

वटवृक्ष मंदिरातील सेवाश्रमातून बाळासाहेबांच्या कर्तृत्वास अमरत्व प्राप्त झाले – डॉ.शैलेंद्र देवळाणकर

एन.बी.ए.मानांकनमुळे कै.कल्याणराव इंगळे महाविद्यालयाची उत्तुंग झेप

वटवृक्ष मंदिरातील सेवाश्रमातून बाळासाहेबांच्या कर्तृत्वास अमरत्व प्राप्त झाले – डॉ.शैलेंद्र देवळाणकर

HTML img Tag Simply Easy Learning    

एन.बी.ए.मानांकनमुळे कै.कल्याणराव इंगळे
महाविद्यालयाची उत्तुंग झेप

HTML img Tag Simply Easy Learning    

कै.कल्याणराव इंगळे यांच्या पुण्यस्मरण निमित्त डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांचे भावोद्गार

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

(अक्कलकोट दि. १८ मार्च)
(शब्दसंकलन – श्रीशैल गवंडी)

HTML img Tag Simply Easy Learning    

नश्वर मानवी जीवन दुसऱ्यांसाठी कष्टत संपवण्यातच जीवनाचे खरे सार्थक आहे’
या वाक्याचा अर्थ कै.बाळासाहेबांच्या कार्याकडे पाहिल्यास उमजतो. हा आदर्श स्वतः कै.बाळासाहेबांनी देखील बाळगून श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून आयुष्यभर जनकल्याणाची कामे केली आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याबरोबरच रुग्णसेवेसाठी रुग्णालय, जवळपास १६ वर्षांपूर्वी तालुक्यातील विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणासाठी तंत्रनिकेतन महाविद्यालयाची निर्मीती केली. संपुर्ण जीवन स्वामी सेवेबरोबरच वटवृक्ष मंदीरातील भाविकांच्या सेवेकरीता समर्पित केले. हे कार्य स्वामी सेवक कै.बाळासाहेब इंगळे यांनी वटवृक्ष मंदिर समितीवर कार्यरत असताना स्वामी सेवेचे धेय बाळगून केले आहे. तह्यात जीवनात त्यांनी पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत अनेक भाविकांच्या सेवेकरीता, मंदीर समितीत कार्यालयीन व धार्मिक कामकाजाकरीता वेळ व्यतीत केला.

आज जरी बाळासाहेब आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याचा व स्वामी सेवेचा ठेवा आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत असल्याने स्वामी सेवेमुळे बाळासाहेबांचे मानवी जीवन सार्थकी झाले आहे. त्यांनी कर्म हीच स्वामी सेवा समजून वटवृक्ष मंदीरात अखंडपणे सेवाश्रम केले. त्यामुळे वटवृक्ष मंदीरातील सेवाश्रमाच्या माध्यमातून कै.बाळासाहेबांच्या कर्तुत्वास अमरत्व प्राप्त झाले असल्याचे
व कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील सर्व शाखांना एन.बी.ए. मानांकन प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक वृंदाचे कौतुक करत महाविद्यालयाची ही उत्तुंग झेप असल्याचे
प्रतिपादन महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर
यांनी केले. ते कै.कल्याणराव उर्फ बाळासाहेबांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमीत्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील बाळासाहेबांच्या अर्धपुतळ्यास व कै.उमेश इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्यासह व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, अमरावतीचे पु.ज्योतिषाचार्य ह.भ.प.सागर महाराज देशमुख (वकील) आळंदीकर,
अक्कलकोट विरक्त मठाचे मठाधिपती म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी, चोळप्पा महाराजांचे वंशज व समाधी मठाचे प.पू.अण्णू महाराज, श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, मराठी नाट्य अभिनेते अथर्व कर्वे, डॉ.शाहीर आझाद नाईकवाडी, करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन वामनराव बदे, मा.संचालक बापूराव देशमुख, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे नूतन संचालक मानसिंग खंडागळे, इंग्रजी माध्यम शिक्षण विभाग सोलापूर संघटनेचे अध्यक्ष लवांडे सर, कराड येथील हुतात्मा बहुउद्देशीय अपंग कल्याणकारी संस्थेचे चेअरमन डॉ.सुनिल फडतरे, गोवा येथील समर्थ मठाचे प्रमुख विश्वस्त जयेश नाईक आदी उपस्थित होते. याप्रसंगी मंदिर समितीचे व महाविद्यालयाचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर व ह.भ.प.सागर महाराज देशमुख (वकील) आळंदीकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा व सन्मानचिन्ह / मानपत्र देऊन विशेष सत्कार सोहळा संपन्न झाला. मंदिर समिती चे विश्वस्त व करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती संपतराव शिंदे यांनी कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने अन्य उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.


याप्रसंगी उपस्थित मान्यवर पत्रकारांचा सत्कारही महेश इंगळे यांनी केला. तत्पूर्वी कै.कल्याणराव उर्फ बाळासाहेबांच्या ८ व्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, रोजगार मेळावा, बक्षीस वितरण सोहळा आदी विविध उपक्रमांचेही उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शाहीर डॉ. शाहीर आझाद नाईकवाडी यांनी श्री स्वामी समर्थांच्या जीवन चरित्रावर व कै. कल्याणराव इंगळे यांच्या जीवन चरित्रावर अत्यंत ज्वलंत पोवाडे सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
या पुण्य स्मरणानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आरोग्य शिबिरात डॉ. वासू यांच्या मार्गदर्शनाखाली २५३ रुग्णांनी लाभ घेतला. रोजगार मेळावा शिबिरात पुणे व जिल्ह्यातील व्यवसायिक कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या मुलाखाती घेण्यात आल्या. बक्षीस वितरण सोहळ्यात कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.नागनाथ जेऊरे यांनी तंत्र निकेतन महाविद्यालयाचा चढता आलेख विशद केला. प्रारंभी १६५ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने प्रारंभ झालेले या तंत्र निकेतनमध्ये आज ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या तंत्र निकेतन महाविद्यालया मध्ये अनेक विद्यार्थी घडले आहेत असे मनोगत व्यक्त केले. यानंतर व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनीही आपापले मनोगत व्यक्त करून कै.बाळासाहेबांना अभिवादन केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, नगरसेवक व अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, प्रा.शिवराया आडवितोट, प्रसाद पाटील सर,
प्रा.शिवशरण अचलेर, अभियंता नवनाथ बनकर, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रथमेश इंगळे, रवि कदम, अरविंद पाटील, बाबासाहेब निंबाळकर, नंदकुमार जगदाळे, बाळासाहेब एकबोटे, शेखर आडवितोटे, अतुल जाधव, सुंदर जाधव, संजय पाठक, अविनाश मडीखांबे, संतोष पराणे, काका सुतार, संजय पवार, प्रसाद सोनार, गिरीश पवार, सागर गोंडाळ, अमर पाटील, शैलेश राठौर, मनोज इंगुले, बाबा सुरवसे, श्रीकांत झिपरे, खाजप्पा झंपले, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, महेश देसाई, सागर गोंडाळ, रवी मलवे, श्रीकांत मलवे, दीपक जरीपटके, ज्ञानेश्वर भोसले, तम्मा शेळके, मुन्ना फडतरे, महेश गायकवाड, प्रसाद सोनार, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ चव्हाण, सुनील पवार, पिंटू सोनटक्के, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, रामचंद्र समाणे, सैदप्पा इंगळे, दादा सावंत, विजय पवार, वैजनाथ खिलारी, विलास चौगुले, शीतल शिराळ, मल्लू माने, बंटी नारायणकर, अरूण शिंदे, विपूल कडबगांवकर, मल्लीकार्जून गवंडी, धीरज जनगोंडा, रवींद्र नष्टे, उमेश सोनवणे, राघवेंद्र सावकार आदींसह महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ घुरघूरे यांनी केले तर आभार उपप्राचार्य विजयकुमार पवार यांनी मानले.

फोटो ओळ – कै. कल्याणराव इंगळे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त कै.कल्याणराव इंगळे यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन व विविध कार्यक्रमाचे शुभारंभ करताना डॉ.शैलेंद्र देवळाणकर व अन्य मान्यवर दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button