गावगाथा

*ॲड.काजूबाई स्वामलिंग हल्ले (टिन वाला) यांची भारत सरकारच्या वतीने नोटरी पदी नियुक्ती.*

निवड नियुक्ती

*ॲड.काजूबाई स्वामलिंग हल्ले (टिन वाला) यांची भारत सरकारच्या वतीने नोटरी पदी नियुक्ती.*

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट प्रतिनिधी:अक्कलकोट येथील न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असलेले व अक्कलकोट वकील संघाचे अध्यक्षा ॲड.काजूबाई स्वामलिंग हल्ले (टिन वाला) यांची भारत सरकार नोटरी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अक्कलकोट वकील संघटने कडून सोलापूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी विक्रम सिंग भंडारी साहेब व तसेच अक्कलकोट न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश माननीय श्री एस.बी.गायकवाड व तसेच अक्कलकोट न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश माननीय श्री.आर.एम.शेख साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
ॲड.काजूबाई स्वामलिंग हल्ले (टिन वाला) ह्या अक्कलकोट येथील न्यायालयात गेल्या १५ पंधरा वर्षापासून वकील म्हणून काम करीत असून त्या अनेक विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत तसेच सध्या अक्कलकोट वकील संघाच्या त्या अध्यक्षा असून त्यांनी उत्कृष्टपणे कामगिरी बजावत आहेत त्यांचे शालेय शिक्षण शिरवळ येथील श्री पंचलिंगेश्वर हायस्कूल येथे व महाविद्यालयीन शिक्षण सी.बी. खेडगी कॉलेज अक्कलकोट येथे तसेच विधी शाखेचे शिक्षण गुलबर्गा येथील एस.एस.लाहोटी लॉ कॉलेज गुलबर्गा येथे झाले आहे.सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, व विविध क्षेत्रातील मान्यवराकडून त्यांच्यावर कौतुकांचे वर्षाव होत आहे.
✍️ सोहेल फरास अक्कलकोट

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button