हन्नूर च्या अनंत चैतन्य प्रशालेत शिक्षक- पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न—-
शिक्षक पालक सहविचार सभा

हन्नूर च्या अनंत चैतन्य प्रशालेत शिक्षक- पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न—-
—————————————- शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलां – मुलींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षक व पालक यांच्यात समन्वय व सवांद असणे खूप गरजेचे असते हा उद्देश डोळयासमोर ठेवून प्रतिवर्षी महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक प्रशालेत शिक्षक- पालक सहविचार सभेचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून आज बुधवार दिनांक २० मार्च रोजी अनंत चैतन्य प्राथमिक सेमी इंग्रजी व माध्यमिक प्रशालेची संयुक्त शिक्षक- पालक सहविचार सभा अत्यंत खेळी- मेळीच्या वातावरणात हन्नूर प्रशालेत पार पडली.प्रारंभी विद्या देवी सरस्वती व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सरांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संस्थेच्या संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूर चे उपसरपंच व युवा नेते श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती,संस्थेच्या शिक्षण विभाग प्रमुख सौ. रुपाली शहा मॅडम,संस्थेच्या समन्वयिका सौ. पुनम कोकळगी मॅडम, सौ. सुरेखा कल्याणशेट्टी प्रशालेचे प्राचार्य श्री.मलकप्पा भरमशेट्टी, मुख्याध्यापक श्री.विलास बिराजदार,पालक श्री.शेकुंबर पटेल,श्री.चंद्रकांत निकम, सौ. गंगुबाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यानंतर सभेच्या सुरुवातीला सेमी प्राथमिक व माध्यमिक प्रशालेच्या वतीने वर्षभरात राबविण्यात आलेल्या शालेय व सहशालेय विविध उपक्रमांचे माहितीपट प्रशालेचे सहशिक्षक श्री.धनंजय जोजन व श्री.शशी अंकलगे यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून दाखवले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी यांनी पालकांशी सवांद साधला व त्यांच्या उत्तम प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक श्री.मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करीत संस्थेचे ध्येय व उद्दिष्टे याविषयी माहिती दिली तसेच आपल्या पाल्याच्या भवितव्याच्या व सुसंस्काराच्या संदर्भात पालकांनी बघ्याची भुमिका न घेता व केवळ शिक्षक, शाळा, परिसर, यास जबाबदार न धरता आपल्या इतर सर्व अडचणी बाजूला ठेवून कर्तव्यदक्ष पालकांची भूमिका पार पाडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी केले व पालकांच्या धोरणात्मक सूचना जाणून घेतल्या.या सभेस दीडशे हून अधिक पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.मल्लम्मा चप्पळगाव मॅडम यांनी केले व सुत्रसंचालन सौ. स्वप्नाली जमदाडे मॅडम यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री.अशोक साखरे यांनी मानले.
