बारामतीसह सातारा व सोलापूर मंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी आणि रविवारी देखील राहणार सुरू
चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ 10 दिवस शिल्लक राहिले असून, बारामती परिमंडलामध्ये वीजबिल वसुलीची धडक मोहीम सुरु आहे. ग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी बारामतीसह सातारा व सोलापूर मंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 23) व रविवारी (दि. 24) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.
पुणे प्रतिनिधी दि. २१, थकीत बिलांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित केला जात असुन, खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यासाठी ग्राहकांना थकबाकीसह पुनर्जोडणी शुल्क जीएसटीसकट भरावे लागणार आहे. घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांनी www.mahadiscom.in या संकतेस्थळाचा तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपचा वापर करावा. याशिवाय भीम, गुगल पे, फोन पे सारख्या विविध युपीआय ॲपद्वारेही वीजबिल सहज भरता येणार आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS किंवा NEFT द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी चा आवश्यक तपशील संबंधित ग्राहकांच्या वीज बिलावर उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा भरणा वेळेत करुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)