

पुणे प्रतिनिधी, दि.२१, अस्सल मराठमोळ्या पुणेकर ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार पद सोपवण्यात आले आहे. एमएस धोनीनं कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. यंदा चेन्नईची धुरा युवा ऋतुराज गायकवाड संभाळणार आहे. सीएसकेकडून सोशल मीडियावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाला उद्यापासून (दि.२२) सुरुवात होणार आहे. चेपॉकवर चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्याआधी धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला, संघाची धुरा युवा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
