गावगाथाजिल्हा घडामोडी
चिखली येथे मंडप साहित्याच्या दुकानाला भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
Chikhali | Pimpri-Chinchwad | Pune | chikhali fire
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
निगडी प्रतिनिधी, दि.२१, पिंपरी चिंचवडच्या त्रिवेणी नगर चौकाजवळ असलेल्या एका मंडप साहित्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास त्रिवेणी नगर चौक तळवडे येथे एका मंडप साहित्याच्या दुकानाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र आणि चिखली उपकेंद्राचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र मंडप साहित्याच्या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)