अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या न्यासाकडून धार्मिकतेबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी ही उत्कृष्ट — मुंबई मंत्रालय येथील समाजकल्याण विभागाचे सचिव पराग वाकडे
प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या न्यासाकडून धार्मिकतेबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी ही उत्कृष्ट — मुंबई मंत्रालय येथील समाजकल्याण विभागाचे सचिव पराग वाकडे

अक्कलकोट : (प्रतिनिधी)

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या न्यासाकडून धार्मिकतेबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी ही उत्कृष्ट असल्याचे मनोगत मुंबई मंत्रालय येथील समाजकल्याण विभागाचे अव्वर सचिव पराग वाकडे यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी के.के. आर क्रिकेट टीम चे कोच ओंकार व अविष्कार साळवी या बंधूंचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी संदीप नवेल, आकाश मोरे न्यासाचे सतीश महिंद्रकर, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, नामा भोसले, दत्ता माने, शरद भोसले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, अनिल बिराजदार,चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार, शावरेप्पा माणकोजी,कुमार सलबत्ते, मल्लिनाथ कोगनुरे, लाला निंबाळकर, कल्याण देशमुख, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
