जिल्हा घडामोडीठळक बातम्या
Pune metro : धुळवडी निमित्त सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत मेट्रो सेवा राहणार बंद ; प्रवाशांची होणार गैरसोय
Pune metro
पुणे प्रतिनिधी दि.२४, धुळवडी निमित्त सोमवारी (दि. 25) मेट्रोची सेवा दुपारी दोन वाजेपर्यंत बंद असणार आहे. त्यानंतर मेट्रो सेवा पूर्ववत सुरू राहणार आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
याबाबत महामेट्रो प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. सोमवारी मेट्रो सेवा दुपारी दोन नंतर सुरू होणार आहे. दुपारी दोन नंतर सुरू झालेली मेट्रो सेवा रात्री दहा वाजेपर्यंत नियमित वेळेत सुरू राहील.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
दुपारपर्यंत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात मेट्रोचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. वाहतूक कोंडीतून सुटका आणि वेळेची बचत होत असल्याने प्रवासी मेट्रोला पसंती देत आहेत. दरम्यान धुळवड निमित्त मेट्रो प्रशासनाने दुपारपर्यंत मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)