गावगाथा

भाजपाचे उमेदवार राम सातपुते आज रोड शो ने करणार प्रचाराचा शुभारंभ

कॉर्नर सभा घेऊन मतदारांशी साधणार संवाद

भाजपाचे उमेदवार राम सातपुते आज रोड शो ने करणार प्रचाराचा शुभारंभ
कॉर्नर सभा घेऊन मतदारांशी साधणार संवाद 

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते सोमवारी सोलापुरात दाखल होणार असून रोड शो द्वारे हे प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. आज दुपारी तीन वाजल्यापासून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ते रोड शो करणार आहेत. तसेच रोड शो नंतर कॉर्नर सभा घेऊन ते मतदारांशी संवाद साधणार आहेत.

आ. राम सातपुते यांचे आगमन आज सोमवारी दुपारी तीन वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथे होणार आहे. या ठिकाणी भाजपा तर्फे त्यांचे स्वागत होईल.

यानंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करून ते रोड शो ला प्रारंभ करतील. यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करतील. तेथून महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्यादेवी होळकर, सोलापूरचे हुतात्मे मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, किसन सारडा, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना ते अभिवादन करणार आहेत.

यानंतर ते ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शन घेणार आहेत. तेथून श्री मार्कंडेय मंदिर दर्शन, श्री आजोबा गणपती मंदिर दर्शन, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन, महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांना अभिवादन, तुकाराम कन्ना यांना अभिवादन करुन दाजी पेठ येथील श्रीराम मंदिरात येणार आहेत. तेथे प्रभू श्रीरामाची आरती करुन दत्त नगरमार्गे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करणार आहेत. यानंतर तेथे कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button