महेश इंगळे यांच्या नेतृत्वात स्वामी भक्तीचे प्रसार उत्तमरीत्या सुरू आहे – हरकरा वेणू गोपाल राव
हरकरा वेणूगोपाळ राव यांचा देवस्थान मध्ये सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

महेश इंगळे यांच्या नेतृत्वात स्वामी भक्तीचे प्रसार उत्तमरीत्या सुरू आहे – हरकरा वेणू गोपाल राव
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२५/३/२४)
श्री.स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे असंख्य स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत येणाऱ्या स्वामी भक्तांना उत्तम सोयी सुविधा देत देवस्थानची वाटचाल सुरू ठेवली होती. परंतु मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी मंदिर समितीचा धुरा हाती घेतल्यानंतर जास्तीत जास्त स्वामी भक्तांची निर्मिती कशी होईल याकरिता कटाक्षाने लक्ष देऊन धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची कार्यप्रणाली विकसित केली आहे. या माध्यमातून अलीकडील काळात स्वामी भक्तीचे विविध उदाहरणे देत त्यांनी भाविकांना स्वामी समर्थांची महिमा सांगितलेली आहे. या पार्श्वभूमीवर विविध समाज माध्यमांची कास धरून त्यांनी संपूर्ण देशातच स्वामी भक्तीचं वातावरण निर्मिती करण्यात त्यांना मोठे यश आलेले आहे. याकरिता महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तीचे प्रसार कार्य उत्तमरीत्या सुरू
असल्याचे मनोगत तेलंगणा राज्याचे
सरकारी प्रोटोकॉल आणि जनसंपर्क सल्लागार हरकरा वेणूगोपाल राव यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी राव यांचा श्री. स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी राव बोलत होते.याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – हरकरा वेणूगोपाळ राव यांचा देवस्थान मध्ये सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.