भुरीकवठे येथील जुनी चावडी व लक्ष्मी देवी मंदिर परिसरात झाडी झुडपे वाढल्याने सर्वत्र अस्वच्छता वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष..
ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष

भुरीकवठे येथील जुनी चावडी व लक्ष्मी देवी मंदिर परिसरात झाडी झुडपे वाढल्याने सर्वत्र अस्वच्छता वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष..


भुरिकवठे — भुरीकवठे तालुका अक्कलकोट येथील जुनी चावडी जीर्ण झाली असून त्याच्यासमोर लक्ष्मी देवीचे मंदिर आहे मंदिर आणि चावडी दोन्ही काटेरी झाडे झुडपे याने वेढलेली आहेत एकेकाळी याच चावडीच्या मुख्य कट्ट्यावर बसून ग्रामदैवत लक्ष्मी देवीच्या यात्रेतील जिंकलेल्या कुस्तीपटूं चे गौरव करून बक्षीस ग्रामस्थामार्फत दिली जात होती असा मुख्य भाग गावाच्या वेशीतून प्रवेश करताच समोर दिसतो ती आज काटेरी झाड या झुडप्यांनी वेढल्यामुळे अस्वच्छ झाल्यामुळे वीस ते पंचवीस ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार करून देखील ग्रामपंचायत डोळे झाक करत आहे.

ग्रामसेवक घरपट्टी वसुली करिता मात्र दररोज या मुख्य चौकात येऊन बघत जातात पण सार्वजनिक स्वच्छतेची ऐशी तैशीच आहे त्याचप्रमाणे श्री लोहार यांच्या बोळातील चार-पाच घराचे सांडपाणी वाहत जाऊन मुख्य गटारीला मिळते आणि ती गटार तुंबल्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे याचा ग्रामस्थांना शेजाऱ्यांना खूप त्रास होतो याकडे ग्रामसेवकाचे लक्ष वेधले असता तुम्ही घरपट्टी भरत नाही त्यामुळे ते काम होणार नाही असे निक्षून सांगता त ग्रामदैवत लक्ष्मी देवीची यात्रा गुढीपाडव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भरते आणि असंख्य भक्त पुणे मुंबई पासून मोठ्या संख्येने यात्रेकरिता देवीच्या दर्शनाकरिता गावी येत


असतात ही बाब ग्रामपंचायतच्या लक्षात आणून देऊन देखील ग्रामपंचायत या सार्वजनिक स्वच्छतेकडे कानाडोळा करते बेजबाबदार वागते सार्वजनिक स्वच्छता झाली नाही तर येथील ग्रामस्थ लवकरच ग्रामपंचायतच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत.