ठळक बातम्या

संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त तळवडे भागात जड वाहनांना बंदी ; पोलिसांचा कडक बंदोबस्त

 

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

निगडी दि.२६, श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त भाविक मोठ्या संख्येने देहूमध्ये दाखल झाले आहेत. या अनुषंगाने तळवडे एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय एमआयडीसीतून येणाऱ्या जड वाहनांना देखील प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

दरम्यान, ही प्रवेशबंदी आणखीन दोन दिवस असणार आहे. मात्र यासाठी वाहन चालकांनि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आश्वासन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

वाहतूकीत करण्यात बदल पुढील प्रमाणे –

तळवडे, महाळुंगे, चाकण वाहतूक विभाग अंतर्गत

०१) देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे हायवे) येथुन देहुगाव कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे. (सार्वजनिक वाहतूक बसेस व दिंडीतील वाहने वगळून)

०२) महिंद्रा सर्कलकडून फिजित्सू कॉर्नर अथवा कॅनबे चौक /आयटी पार्क चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग महिंद्रा सर्कल ते निघोजे ते मोईफाटा मागें डायमंड चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

०३) तळेगाव-चाकण रोडवरील देहुफाटा येथुन देहूगाव जाणारे रस्त्यावरुन सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग सदर मार्गावरील वाहने एच.पी. चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

०४) नाशिक पुणे हायवेवरील चाकण तळेगाव चौक तसेच स्पायसर चौक येथून महिंद्रा सर्कल मार्गे आयटी

पार्क / कॅनबे चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग १. सदर मार्गावरील वाहने हि मोशी भारतमाता चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. पर्यायी मार्ग २. सदर मार्गावरील वाहने महिंद्रा सर्कल- indurance चौक एच पी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

०५) देहू कमान ते १४ टाळकरी कमान (Dehugaon) ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद, खंडेलवाल चौक

०६) ते देहू कमान (मुख्य) ते परंडवाल चौक हा रस्ता सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद.

०७) जुना पालखी मार्ग (कंद पाटील2 लोक चौक) ते झेंडे मळा (जकात नाका) जाणारी वाहतूक वन-वे (एकदिशा मार्ग) करण्यांत येत आहे.

हा बदल सोमवारी दुपारी १२ पासून ते बुधवारी रात्री ९ वाजेपर्यंत राहणार आहे. यावेळी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारचे वाहनांचे वाहतुकीसाठी बंद राहील.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button