PCMC : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र परवाना धारकांना शस्त्रे जमा करण्याचे आदेश
Pimpri-Chinchwad news
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
निगडी (प्रतिनिधी) दि. २, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परवानाधारक शस्त्र असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्याकडील शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे 1400 पेक्षा अधिक शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. त्यांच्याकडे शस्त्रे पोलिसांच्या शस्त्रागारात जमा करण्यात येत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
निवडणूक प्रक्रियेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निवडणूक सेलची स्थापना केली आहे. या सेलच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचे संपूर्ण नियोजन केले जात आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सुमारे 1400 पेक्षा जास्त शस्त्र परवानाधारक आहेत. यामध्ये सेवानिवृत्त पोलिस, लष्करी अधिकारी-कर्मचारी, अति महत्त्वाच्या व्यक्ती, नामांकित व्यक्ती, राजकीय व्यक्ती, उद्योजक, व्यावसायिक आदींचा समावेश आहे. त्यातील काही जणांना सुरक्षेच्या कारणास्तव शस्त्र बाळगण्यास सवलत मिळते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)