
*श्री बसवराज प्रशालेत माजी* **विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न*
करजगी ता. अक्कलकोट येथील श्री. बसवराज माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण प्रशालेमध्ये सन मार्च 2002 -मध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण पूर्ण करून गेलेल्या व सध्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल 23वर्षानंतर नुकताच संपन्न झाला.
श्री. गुड्डद बसवराज मंगल कार्यालय करजगी येथे संपन्न झालेल्या या मेळाव्याचे उदघाटन श्री. म. नि. प्र. शिवानंद महास्वामीजी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री मठाचे श्री. म. नि. प्र. शिवानंद महास्वामीजी हे भूषविले होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. दयानंद उंबरजे, मुख्याध्यापक एस. बी. बिराजदार माजी मुख्याध्यापिका सौ. आर. एम. पत्की, निवृत्त पर्यवेक्षक श्री. सी. सी. चडचण, श्री.एस.एन. पादी, श्रीमती व्ही.बी.तालीकोटी , सौ. एस आय मठपती, श्री.एस. वाय. कुडले, श्री. एन.सी.स्वामी, श्री ए.एम. मुंडेवाडी श्री. एस. बी. उंबरजे आदी उपस्थित होते.
श्री. सागर शावळ यांच्या प्रास्ताविकाने सुरुवात झालेला हा कार्यक्रम अनुक्रमे माजी विद्यार्थ्यांचे परिचय, मनोगत , गुरुवर्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार, अतिथींच्या मनोगतानी साजरा झाला.
सदर प्रसंगी निवृत्त पर्यवेक्षक श्री. सी. सी. चडचण, मुख्याध्यापक श्री. एस. बी.बिराजदार, प्रमुख अतिथी श्री. दयानंद उंबरजे इत्यादींची मार्गदर्शनपर भाषणे झाली आणि सहशिक्षक श्री.के. पी. सरसंबी यांचे ” पाखरं जेव्हा घरट्यात येतात… ” या कवितेचे वाचन झाले आणि शेवटी समूह छायाचित्रण व सहभोजनांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी सागर शावळ, विनोद माशाळे, डॉ.राहुल कारीमुंगी , महांतेश गुजा , निसर्ग गांधी इत्यादींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. डी. पिरगोंडे यांनी केले, आभार प्रदर्शन श्री. विनोद माशाळे सरांनी केले तर वंदे मातरम या गीतांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
