गावगाथा

हनुमान जन्मोत्सवनिमित्त गौडगांव मारूती मंदिरात धार्मिक कार्यक्रम

२३तारखेला रक्तदान शिबिर व शोभ यात्रा,

हनुमान जन्मोत्सवनिमित्त गौडगांव मारूती मंदिरात धार्मिक कार्यक्रम

२३तारखेला रक्तदान शिबिर व शोभ यात्रा,

अक्कलकोट/प्रतिनिधी
गौडगांव ( ता.अक्कलकोट) येथील दक्षिण मुखी जागृत मारूती मंदिरात हनुमान जन्मोत्सवनिमित्त२२ २३ तारखेला विविध धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हनुमान जन्मोत्सवनिमित्त मारुती मंदीर व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व सजावट अंतिम टप्यात असुन अतिशय सुंदररित्या नियोजन केले जात आहे.
२२तारखेला भजन,किर्तन, व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.२३तारखेच्या पहाटे ४ वाजता मारुतीस महारूद्राभिषेक,नवग्रह पुजा,
शनिपुजा,होमहवन व यज्ञचा कार्यक्रम पार पडणार आहे.त्यानंतर पाळणा व दर्शनाकरिता आलेल्या भाविकांना हनुमान चाळीसावाचन, १० वाजेनंतर श्रीच्या भव्य पालकी सोहळा तर दुपारी १२ वाजता विशेष महाआरतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच हनुमान जन्मोत्सवनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हनुमान जन्मोत्सवनिमित्त मंदीर परिसात अतिशय सुंदररित्या नियोजन केले जात आहे.वर्षभर नवस केलेल्या भक्तांनी,नवस पूर्ण करण्यासाठी उत्सवला मोठी गर्दी केले जाणार आहे.भक्तांना मारूतीचे शुलभ दर्शन मिळावा म्हणुन मंदीर समितीकडून तयारी सुरू आहे.पिण्याच्या पाण्याचे नियोजन स्वच्छतागृहे, भक्तनिवास अशा अनेक भक्तासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे.जन्मोत्सवनिमित्त मारूती अन्नछत्र मंडळात निशार चांदशेख पुणे यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले असुन सकाळी८ते रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद चालु राहणार आहे.

चौकट :
हनुमान जन्मोत्सवनिमित्त गौडगाव बुI येथे भव्य कुस्तीचे आयोजन केले असुन इच्छुकानी सहभाग घ्यावे असे अवाहान मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे व कार्याध्यक्ष सिद्राम वाघमोडे यांनी केले आहे.

चौकट: –
अन्नदानाची व समाजकार्याची मारूतीसेवा आपल्या कृपाशीर्वादाने होत आहे.मारूतीकार्यात मोलाचे
सहकार्य करून देणगी रूपाने अन्नछत्र मंडळास आपले आशीर्वाद मिळावेत,अन्नदान सेवेस व चाललेल्या समाजकार्यास सढळ हाताने सहकार्य करुन या मारुतीसेवेत सहभागी व्हावे संपर्क मो.न९४२२४५८८९८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button