स्वामी कृपेने लोकसेवेची संधी लाभावी ; ओमराजे निंबाळकर यांचे स्वामी समर्थांच्या चरणी साकडे
धाराशिव महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे मनोगत

स्वामी कृपेने लोकसेवेची संधी लाभावी ; ओमराजे निंबाळकर यांचे स्वामी समर्थांच्या चरणी साकडे

धाराशिव महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे मनोगत

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१९/४/२४)
श्री स्वामी समर्थांच्या कृपेनेच आपल्या सामाजिक व राजकीय सेवेची वाटचाल चालू आहे. यंदाही लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून स्वामी कृपेने आपल्याला पुन्हा एकदा लोकसेवेची संधी लाभावी याकरिता स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घालून दर्शन घेतले असल्याचे मनोगत धाराशिव लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी ओमराजे निंबाळकर यांचा श्री स्वामी समर्थांचे
कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार केला व आगामी निवडणुकीत निंबाळकर यांच्या यशाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, रामचंद्र समाणे, विपुल जाधव, स्वामीनाथ मुमूडले, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – ओमराजे निंबाळकर यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
