
*यूपीएससी उत्तीर्ण स्वाती मोहन राठोड हिचा एम के फाउंडेशन च्या वतीने सत्कार.*

सोलापूर – स्वाती मोहन राठोड (राहाणार सोलापूर) ही बंजारा समाजाची मुलगी अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन यूपीएससी परीक्षेत ४९२ रँक घेऊन पास झाली. स्वातीच्या यशामुळे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्वाती ही लहानपणापासूनच जिद्दी,हुशार व होतकरू असल्याने, कबाड कष्ट करून,भाजी विकून,आई वडिलांनी तिला शिकवले, स्वातीने आपल्या घराची परिस्थितीची व आई वडिलांची मेहनत याची जाणीव ठेऊन रात्रंदिवस अभ्यास करून यश मिळवून दाखविले.

स्वातीच्या ह्या यशाबद्दल आज एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी स्वाती राठोड यांच्या घरी भेट देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्वातीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना व शिक्षक वर्ग तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व स्नेही मंडळी यांना दिले आहे. स्वातीच्या यशाने शुभेच्छांचा वर्षाव सर्व समाज बांधवांकडून व मित्रमंडळी कडून होत आहे.

*फोटो ओळ*
स्वाती राठोड हिचा सत्कार करताना एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे व इतर
