अक्कलकोटच्या क्षितिजावरील बहुआयामी व्यक्तिमत्व: श्री अमोलराजे भोसले..
जिवनामध्ये कोणाबद्दल काहीतरी लिहावं म्हटलं तर शब्द हे सहजासहजी सुचत नसतात. प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतर देखील ठराविक शब्दांपलीकडे काही सुचत नाही. शब्दांना तेव्हाच पान्हा फुटतो जेव्हा समोरील व्यक्ती ही साऱ्या जगाच दुःख आपल्या हृदयामध्ये सामावून घेऊन लोकसेवा करत असते. असं जनसेवेला वाहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे तुमचं आमचं सर्वांचं लाडक राज श्री अमोल राजे. तसं पाहिलं तर श्री अमोल राजे व माझी भेट प्रत्यक्षात समोरासमोर असं कधी आज पर्यंत झालीच नाही. तरी देखील मी त्यांच्यावरती लिहितोय याच एकच कारण त्यांचे व्यक्तिमत्व हे जनसेवेला संपूर्णपणे वाहून घेतलेल आहे.
ब्रह्मांडनायक श्री.स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पतितपावन झालेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या अक्कलकोट तालुका व आसपासच्या परिसरामध्ये मराठी भाषा ,परंपरा व संस्कृती टिकवण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे. असे जनसेवेचा उपजत वसा आणि वारसा लाभलेले ध्येयवेडे लोकसेवक , असंख्य कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरणारे आपल्या तालुक्यातील रयतेचे खरे राजे म्हणजे श्री अमोलराजे जन्मेंजयराजे भोसले. श्री स्वामीसमर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य हे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री जन्मेंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त श्री अमोल राजे भोसले यांच्या देखरेखीखाली चालते.महाराष्ट्रसह देशभरातील असंख्य स्वामी भक्तांना अन्नदान हे दिवसातून दोन वेळा या मंडळाकडून करण्यात येते. देशभरातून येणाऱ्या स्वामी भक्तांची विश्रांतीची सोय ही भक्त निवासामध्ये अतिशय उत्तम प्रकारे करण्यात येते. श्री अमोल राजे यांचे कार्य हे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या जाती धर्मातील अडलेल्या नडलेल्या गोरगरीब रयतेला मदत करणारे आहे. त्यांनी कित्येक गोरगरीब रयतेच्या झोपडीत स्वाभिमानाची ज्योत पेटवली आहे .कित्येक नव तरुणांना दिशा देऊन त्यांना उभ केल आहे. कित्येका ना त्यांनी अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार मिळवून दिलेला आहे.समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक स्तरातील गुणीजनांची पारख करून ते त्यांना दरवर्षी गुरुपौर्णिमाला मान्यवरांच्या हस्ते गुणिजन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची पोच पावती देतात ,त्यांना प्रेरणा देण्याचे कार्य करतात .सन २०१९च्या काळामध्ये कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला गुडघ्यावर आणले होते .अशा काळामध्ये श्री अमोल राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ,त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून अन्नछत्र मंडळाच्या भक्त निवासमध्ये कोरोना विलगीकरण कक्ष स्थापन करून सरकारी आरोग्य यंत्रणे सोबत खांद्याला खांदा लावून त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिले. संकट काळामध्ये सर्व रयतेला उभारी देण्याचे कार्य त्यांनी केलं. आपल्या तालुक्यातील तरुण होतकरू पैलवानांना सकस खुराक दर महिन्याला अमोल राजे भोसले यांच्या ट्रस्ट तर्फे दिला जातो. सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील व आसपासच्या भागातील पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना अन्नछत्र मंडळातर्फे दोन वेळेचे जेवण मोफत स्वरूपामध्ये अनेक वर्षे दिले जात. सदर जेवण अतिशय दर्जेदार व रुचकर आहे. याचा मी २०१०ते ११दरम्यानचा प्रत्यक्ष लाभार्थी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या एसटी बससाठी सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था निर्माण केली आहे .एसटीच्या चालक वाहकांसाठी वातानुकलीत सुसज्य रेस्टरूमची व्यवस्था केली आहे .चालक वाहकांच्या जेवणासाठी स्वतंत्र राखीव टेबलाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व स्तरातील, सर्व क्षेत्रातील माणसांची आईच्या मायेने आपुलकीने काळजी घेणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व श्री अमोल राजे भोसले आहेत. प्रजेच्या मनातील भावभावना राजाला समजणं आवश्यक असतं ,तेव्हाच प्रजेच्या मनात राजा बद्दल आदरभाव निर्माण होतो. हा आदरभाव सर्वसामान्य रयतेच्या मनात श्री अमोल राजे यांच्या बद्दल आहे. राजासारखं मन आणि मनासारखा राजा हे अमोल राजे यांना तंतोतंत जुळून येतं.तालुक्यातील कोणत्याही महापुरुषांची जयंती असो, ती जयंती लोकप्रबोधनात्मक आणि थाटामाटात साजरी झाली पाहिजे असे त्यांचे मत असते. नव्हे ते त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत असतात .शिवजयंतीला तर ते आपल्या स्वतःच्या मंडळासह इतर अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांना स्वखर्चाने चांगल्या प्रतीचे कपडे शिवून देत असतात. दरवर्षी गुरु पौर्णिमेला अक्कलकोट तालुका वाशीय जनतेला ते सांस्कृतिक मेजवानी देत असतात.त्या काळामध्ये ते महाराष्ट्र कर्नाटकातील नामवंत व्यक्तींची व्याख्याने, कीर्तन कीर्तनकारांची कीर्तने, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांचे गीत, कला ,नृत्य गायन ,वक्तृत्व यासाठी प्रसिद्ध असलेल्यांची कलाकुसर सादर करायला लावून तालुकावाशीय जनतेचे मनसोक्त ज्ञानप्रबोधन करण्याचे काम ते करत असतात. यामध्ये सर्व स्तरातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा समावेश असतो. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ते तालुकावाशीय जनतेचे वैचारिक भरणपोषण सतत करत असतात.स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी राज्य परराज्यातील महत्त्वाचे राजकारणी, अनेक नामवंत कलाकार ,खेळाडू पासून ते अनेक अधिकारी येतात. त्या सर्वांचे न चुकता अन्नक्षत्र मंडळातर्फे आदर सत्कार करत असतात.अमोल राजे यांचे दुसरं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते तालुक्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांशी समन्वय साधून असतात.दोघांनाही आपलंसं करून मार्गक्रमण करण्याची त्यांची कला खूप छान आहे .विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मन न दुखावता ते सत्ताधारी आमदाराशी जवळीक साधून आपले वेगवेगळे कार्य ते करून घेत असतात. तालुक्यातील सत्ताधारी पक्षातील नेते व विरोधी पक्षातील नेते यांच्याशी समतोल राखून समाजकारण, धर्मकारण करण्याची महाराजांची खुबी वाखाणण्याजोगी आहे. सर्व नामवंत राजकारण्यांच्या गराड्यात राहून देखील राजकारणापासून अमोल राजे हे अलिप्त आहेत. ते धर्मकारण आणि समाजकारणास सर्वस्व वाहून घेतलेले आहेत. इतर सर्व जाती धर्मातील जनतेची मनोभावे सेवा करत असताना आपण मुळात ज्या समाजातून जन्माला आलो त्या समाजा बद्दल त्यांना खूप आत्मीयता आहे. नुकतीच सोलापूरला जी समाजाची शांतता रॅली निघाली, त्याचे अक्कलकोट तालुक्यातील संपूर्ण नियोजन हे श्री अमोल राजे भोसले यांनी केले.सर्व क्षेत्राला दिशा आणि ताकद देण्याचं एवढं मोठं व्यक्तिमत्व असलेले श्री अमोल राजे यांच्या मनाला मीपणाची भावना कधीच स्पर्श केली नाही. ते फक्त माणसांनाच उभारी देण्याचं, त्यांना आधार देण्याचं कार्य करतात असं नाही तर ते निसर्ग प्रेमी देखील आहेत आणि त्या प्रेमाच्या पोटीच अक्कलकोट सोलापूर रोडवर अजिंक्यतारा हॉटेलच्या आसपास रोड लगत सुंदर अशी वडाची झाडे लावली आहेत .त्यांचे पालनपोषण ते जिवापाड करतात. तसेच अक्कलकोट शहरातील श्री फत्तेसिंह क्रीडांगणामध्ये देखील चांगल्या प्रकारच्या झाडाची लागवड करून त्याची ते देखभाल करतात. ते अन्नछत्र परिसराला लागूनच गोपालन देखील करतात. अन्नछत्र परिसरामध्ये अतिशय सुंदर अशी शिवसृष्टी त्यांनी निर्माण केली आहे.नावाने अमोल असलेले हे राजे सर्वसामान्य रयतेसाठी मात्र खूपच अनमोल आहेत .अमोलराजे हे आपली मराठी भाषा, कला, क्रीडा, संस्कृती याबद्दल प्रचंड जिव्हाळा असलेले व्यक्तिमत्व आहेत. आपल्या भारतीय पारंपरिक खेळाचा देखील त्यांना खूप खूप अभिमान आहे. ते गुरुपौर्णिमेला , शिवजयंती, गणपती उत्सव मध्ये मोठ्या आनंदाने लेझीम खेळत असतात.मी कुठेतरी ऐकलं होतं अथवा वाचलं होतं की अपार लोकप्रियता लाभलेल्या नेत्यांचे, व्यक्तिमत्वाचे एक पाय हे लोकसमूहात आणि दुसरे पाय हे आकाशाकडे उंच झेपावलेले असते .तेव्हाच तो सर्वगुणसंपन्न लोकनेता बनू शकतो .त्याचे सर्वगुण संपन्न उदाहरण म्हणजे जनसामान्यांच्या काळजात घर करून राहिलेले आदर्श व्यक्तिमत्व श्री अमोल राजे. अक्कलकोट तालुक्यातील अठरापगड जाती बराबलुतेदार यांना सोबत घेऊन चालणार, सर्वसामान्यांच्या मनात ,काळजात घर केलेलं सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच श्री अमोल राजे. सर्व जाती धर्म पंथातील रयतेला आपलंसं वाटणार, उगवत्या सूर्याप्रमाणे कायम प्रसन्न, अल्हाददायक व पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शितल असलेल व्यक्तिमत्व म्हणजे श्री अमोल राजे .आपण स्वतः मोठे होत असताना आपल्या अवतीभोवतीची माणसं देखील मोठी झाली पाहिजेत यासाठी सर्वांना प्रगतीच्या वाटेने घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजेच अमोलराजे. सतत असंख्य कार्यकर्त्यांच्या ,स्वामी सेवेकऱ्याच्या आणि स्वामी भक्तांच्या गराड्यामध्ये असलेले अतिशय उत्साही ,लोकप्रिय व्यक्तिमत्व .त्यांच्या सामाजिक धार्मिक कार्याची दखल घेऊन स्टेट इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील मानाचा ‘सर सन्मान’ पुरस्कार नुकताच श्री अमोल राजे भोसले यांना जाहीर झाला आहे .यापूर्वी देखील त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा सुवासिक सुगंध संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर पसरत आहे .आभाळा एवढं अथांग, विशाल असलेले आपले हे व्यक्तिमत्व सदोदित निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारखं सतत वाहत राहू दे..आणि आपल्या हातून लोकसेवेचे,समाजसेवेचे हे कार्य सतत चालत राहूदे ही सदिच्छा…🙏🙏 शब्दांकन:श्री.मारुती देविदास शिंदे…वागदरी…