
संदीप परबयांना राज्यस्तरीय “शिक्षण दर्पण” पुरस्कार प्रदान

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयित्री बहिणाबाई साहित्य परिषद, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय *” शिक्षण दर्पण “* हा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कल्याण येथील ॲचिवर्स महाविद्यालयाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्री. गजानन ओक, महाराष्ट्र साहित्य परिषदचे अध्यक्ष श्री.विष्णू पाटील, बृ.मनपा माध्यमिक शिक्षण विभागाचे माजी शिक्षणाधिकारी मा.श्री.भानुदास बोराळे, बृ.मनपा शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मा.श्री.आनंदराव सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
