गावगाथा

धर्मसंकीर्तन महोत्सवात रंगले सांगलीच्या अभिषेक काळेंचे अभंगरंग.

वटवृक्ष मंदीरात अभिषेक काळेंच्या अभंगरंगाने गुंफले धर्मसंकीर्तन महोत्सवाचे आठवे पुष्प.

धर्मसंकीर्तन महोत्सवात रंगले सांगलीच्या अभिषेक काळेंचे अभंगरंग.

वटवृक्ष मंदीरात अभिषेक काळेंच्या अभंगरंगाने गुंफले धर्मसंकीर्तन महोत्सवाचे आठवे पुष्प.

(अक्कलकोट, दि.०१/०५/२०२४) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन सोहळ्यातील आजचे आठवे पुष्प सांगलीचे सुप्रसिध्द गायक अभिषेक काळेंच्या अभंगरंगाने गुंफले गेले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवर कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार केला.
या अभंगरंग सेवेत व भक्ती संगीत सेवेत गायक अभिषेक काळे व सहकलाकारांनी
दत्त दिगंबर दैवत माझे, मज भेटुनी जाहो, दत्तसख्या अवधूता, स्वामी समर्थ नामाचा, घोष करा, निघालो घेऊन दत्ताची पालखी, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, सूर निरागस हो,
ये रे कृष्णातीरी वसणाऱ्या अशी विविध सुरमयी पदे / गाणी अत्यंत तालबध्द स्वर रचत गाऊन उपस्थित भाविकांना अभंगरंगाच्या श्रवण रंगात रंगविले. या अभंगरंग गायन सेवेत त्यांना हार्मोनियमवर ओंकार पाठक, तबल्यावर विवेक पोतदार, पखवाजवर ज्ञानेश्वर दुधाणे, टाळवर अक्षय सरदेशमुख यांनी साथसंगत केली.


प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, अमर पाटील, गिरीश पवार, मोहन जाधव, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, सुरेखा तेली, कौशल्या जाजू, उज्वलाताई सरदेशमुख, सागर गोंडाळ, स्वामीनाथ माटके, विपुल जाधव, प्रसाद सोनार, शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील, सचिन पेठकर, संतोष पराणे, अभिषेक गवंडी, स्वामीनाथ गायकवाड, प्रसाद किलजे आदिसह अनेक भाविक भक्त उपस्थित राहून या अभंगरंग सेवेचा लाभ घेतला.

फोटो ओळ – धर्मसंकीर्तन सोहळ्यात व्यासपीठावर अभंगरंग सेवा सादरीकरण प्रसंगी अभिषेक काळे व सहकलाकार दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button