जि.प.प्रा.शाळा चंद्रकांत पाटील वस्ती,जेऊर येथे सिद्धेश्वर फाऊंडेशन व श्री.मेघराज राठोड फाऊंडेशन(सोलापूर ) यांच्या संयुक्त विद्यमाने “एक विद्यार्थी,एक झाड” या उपक्रम शुभारंभ
उपक्रम

जि.प.प्रा.शाळा चंद्रकांत पाटील वस्ती,जेऊर येथे सिद्धेश्वर फाऊंडेशन व श्री.मेघराज राठोड फाऊंडेशन(सोलापूर ) यांच्या संयुक्त विद्यमाने “एक विद्यार्थी,एक झाड” या उपक्रम शुभारंभ
जि.प.प्रा.शाळा चंद्रकांत पाटील वस्ती, जेऊर येथे श्री.सिद्धेश्वर फाऊंडेशन व श्री.मेघराज राठोड फाऊंडेशन(सोलापूर ) यांच्या संयुक्त विद्यमाने “एक विद्यार्थी, एक झाड” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
वरील फाऊंडेशनकडून झाडे उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.सिद्धार्थ सर्जे व सुभाष राठोड, सिद्धाराम आलुरे,गुरुशांत रामपुरे, अनिल सर्जे, सुनील सर्जे, राजेंद्र बलसुरे,सोमलिंग हिरेमठ, यशवंत हिरापुरे, जेऊर गावचे उपसरपंच श्री.काका पाटील,करजगी बिटाचे आदरणीय विस्ताराधिकारी श्री.गायकवाड साहेब, श्री.पंडित गुरव आणि स्वामी C.M.सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.श्रीकांत आलुरे, श्री.बसवराज बोरीकरजगी, श्री.इरेश बिरोडे व श्री.श्रीशैल हुक्केरी यांनी केले.