अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत आहे — अंजली समाधान आवताडे
प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत आहे — अंजली समाधान आवताडे

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याचे मनोगत मंगळवेढा –पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांच्या पत्नी अंजली समाधान आवताडे यांनी व्यक्त केल्या.*

त्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आले असता प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्या समवेत श्री व सौ. बाळासाहेब नाडे, आवताडे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.पुणे कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक श्री व सौ. जगदीश नाडे, श्री व सौ. संदीप नाडे, सुधीर माकणे हे उपस्थित होते. दरम्यान श्री व सौ. बाळासाहेब नाडे यांचा देखील सत्कार अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, पिंटू सोनटक्के, वासू कडबगांवकर, एस.के.स्वामी, बाळासाहेब घाडगे, सिद्धाराम कल्याणी, कल्याण देशमुख, सतीश महिंद्रकर, मल्लिनाथ कोगणुरे, शावरेप्पा माणकोजी, शिवकुमार स्वामी, निखील पाटील, महेश मुळे, प्रविण घाडगे, विजय माने, नामा भोसले, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, चंद्रकांत हिबारे, राहुल,इंडे, काशिनाथ वाले, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
