मोदी- योगींच्या सभेनंतर सोलापुरात भाजपचं पारडं मजबूत ? कोण मारणार बाजी ? वाचा सविस्तर
सोलापूर लोकसभा निवडणुकीचं चित्र दिवसेंदिवस बदलत चालले आहे. निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असताना सुद्धा निवडणुकीबाबत दररोज वेगवेगळ्या तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच खरा प्रश्न आहे, की तो म्हणजे सोलापूर लोकसभेत यंदा कोण बाजी मारणार..? काॅंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे, की भाजपचे राम सातपुते..?


१५ दिवसांपूर्वीच आमदार प्रणिती शिंदेंचा बोलबाला दिसत होता. राम सातपुते केवळ माळशिरस पुरतेच मर्यादित आहेत की काय असे वाटत होते. अशात साहजिकच टर्निंग पॉइंट ठरलं, ते म्हणजे पंतप्रधान मोदी आणि योगी यांच्या झालेल्या धडाक्याच्या सभा.

मोदी- योगींच्या सभेनंतर सोलापुरात भाजपचं पारडं मजबूत होतानाचं चित्र अवघं सोलापूर जिल्हा पाहतोय. काल पर्यंत कोण ते राम सातपुते म्हणणारे आज त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे हमी देत आहेत. मोदी आणि योगींच्या झालेल्या विराट सभेने जनतेला आकर्षित केल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. पण तरीही प्रणिती शिंदेंना हलक्यात घेऊन चालणार नाही हे महायुतीला चांगलंच ठाऊक आहे. सोलापूर मध्य मध्ये तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणितींचा चाहतावर्ग ही मोठा आहे. मात्र काही अंशी तरी का होईना सध्याचा कौल पाहता राम सातपुते अर्थात भाजपचं पारडं जड झालं आहे यात शंका नाही.
