गावगाथा

जॉय सभासदांची बाल संस्कार शिबिराला भेट

राज्यात अशी संस्कार शिबिरे सर्वत्र व्हायला हवीत...गणेश हिरवे

जॉय सभासदांची बाल संस्कार शिबिराला भेट

राज्यात अशी संस्कार शिबिरे सर्वत्र व्हायला हवीत…गणेश हिरवे

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

मुंबईतील जॉय ऑफ गिविंग या संस्थेच्या सभासदांनी नुकतीच वाडा पालघर येथील गांधारे वाडा आणि देवघर येथे उन्हाळी सुट्टी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १५ दिवसीय बाल संस्कार शिबिरात उपस्थित राहून तेथील विद्यार्थीनी हितगुज केलं.यावेळी जॉय चे गणेश हिरवे, असुंता डिसोजा, वैभव पाटील, यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.या दोन्ही शिबिरात जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले असून येथे विद्यार्थ्याना, हरिपाठ, संस्कृत संभाषण, हनुमान चालीसा, मैदानी खेळ, योगा याबरोबरच इतर अनेक चांगल्या गोष्टींचे प्रशिक्षण दिले जात आहे.अशी संस्कार शिबिरे सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात मुंबई मध्ये सुद्धा आयोजित व्हायला हवीत असे असे मनोगत हिरवे सरांनी व्यक्त केले आणि आपण शिकलेल्या चांगल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहचिण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे सांगितले. यावेळी वैभव सरांच्या वतीने शिबिरातील मुलांसाठी निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा आणि इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन विजेते आणि सहभागी सर्व विद्यार्थ्याना प्रमाणपत्र, मेडल आणि खाऊ देऊन सन्मानित करण्यात आले.आळंदी येथील पांडुरंग महाराज भोईर आणि हभप राजेश बांगर महराज यांनी या विद्यार्थ्याना चांगल्या गोष्टी शिकविण्याची जबाबदारी घेतलेली आहे.यावेळी विद्यार्थ्याना गणेश धनावडे यांचे तर्फे रायटिंग पेड तर सूर्यकांत सालम यांनी पेन भेट दिले. चंद्रशेखर सावंत, गजानन पाटील, रमेश माळवदे, प्रियांस हिरवे, प्रथमेश माळवदे आदी जॉय चे कार्यकर्ते देखील वेळातवेळ काढून शिबिरात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button