अचलेर शिवबसव संस्थान मठात पुराण प्रारंभ ; मठ संस्कार देणारे केंद्रे : नंदगवाचे राजशेखर महस्वामिजी
बसव जयंतीनिमित्त सुरू झालेला पुराण कार्यक्रम मंगळवार 24 मे रोजी समाप्त होणार आहे.

अचलेर शिवबसव संस्थान मठात पुराण प्रारंभ ;
मठ संस्कार देणारे केंद्रे : नंदगवाचे राजशेखर महस्वामिजी …

बसव जयंतीनिमित्त सुरू झालेला पुराण कार्यक्रम मंगळवार 24 मे रोजी समाप्त होणार आहे.


शनिवारी रात्री उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील आचलेर येथील शिवबसव हिरेमठ येथे बसव जयंती व ज्येष्ठ महास्वामीजींच्या पुण्य स्मरणार्थ आयोजित पुराण कार्यक्रमात नंदगवा विरक्त मठाचे राजशेखर महास्वामीजी आपले विचार व्यक्त करतान पुढे म्हणाले की , मातांनी आपल्या मुलांना मठात आणून त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी गुरूकडून लिंगदीक्षा द्यावी. चांगला समाज घडवण्याची जबाबदारी घरातील आई व मठातील गुरू या दोघांवर मोठी जबाबदारी आहे . इतके मठ आणि मठाधिपती असतानाही लिंगायत समाज भरकटत चालेला असल्याची चिंता महस्वामिजिनी व्यक्त केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील अचलेर येथील शिवबसव हिरेमठ येथे आयोजित पुराण कार्यक्रमात नंदगवाचे राजशेखर महस्वामिजी, अचलेर विरक्तमठचे बसवराजेंद्र महवामिजी, शिवबसव हिरेमाठाचे अभिनव सुत्रेश्वर महस्वामिजी, पुराणिका मल्लय शास्त्री विजयकुमार आळंद, शिवानंद गोगाव आदी उपस्थित होते.

उपस्थित अचलेर विरक्तमठचे श्री.बसवराजेंद्र महस्वमिजी म्हणाले की, अचलेर गाव जरी मराठवाड्यात असले तरी उत्तम लिंगायत संस्कृती असलेले गाव आहे. येथे दोन मठ असून मी आणि श्री.अभिनव सुत्रेश्वर महासवामिजी समाजाच्या विकासासाठी जोड बैला सारखे एकत्र काम करत असल्याचे सांगितले.
बाळेहोन्नूर शाखा मठाचे शिवबसव हिरेमाठा चे मठाधिपती अभिनव सुत्रेश्वर स्वामीजी, शिवबसव मठ हा प्राचीन मठ आहे . गेल्या तीन वर्षांपासून मठात चांगले सार्वजनिक कार्यक्रम राबविले जात असून, मठातील भक्तांनी प्रतिसाद देण्याची गरज असल्याचे सांगितले.
पडसावळीच्या मल्लय्या शास्त्री यांनी कलबुर्गीच्या महादासोही शरणबावेश्वराचा पुराण प्रवचन केलें. आणि विजयकुमार आळंद यांनी तबल्याची साथ दिली.
लिंगायत समाजाच्या उत्थानासाठी चांगले कार्य करणारे वागदरी चे पत्रकार शिवानंद गोगाव, घालय्या स्वामी, शांतेश्वर कोटे, अप्पू करजगी यांचा गौरव करण्यात आला.
विकास स्वामी, मल्लय्य शिवशरण स्वामी, मल्लीनाथ अष्टगे, शिवराजा स्वामी, सुत्रेश्वर स्वामी, अमृतप्पा पटणे, प्रवीणा स्वामी यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
शेखर स्वामी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मल्लय्या स्वामी यांनी आभार मानल

विशेष कार्यक्रम
बसव जयंतीनिमित्त सुरू झालेला पुराण कार्यक्रम मंगळवार 24 मे रोजी समाप्त होणार आहे.
24 मे रोजी सकाळी पडसावळी-डोणागाव मठाचे डॉ.शंभूलिंग महसवामिजी, राजेश्वरचे श्री घनलिंगरुद्रमुनी स्वामीजी, जेवळी येथील गंगाधरा स्वामीजी, बसवेश्वर मंदिराचे दत्त महाराज यांच्या उपस्थितीत श्री अभिनव सुत्रेश्वर महस्वामिजिंच्या अध्यक्षतेखाली गद्धागिस. महारुद्राभिषेक, पंचाचार्य ध्वजारोहण, अय्यचार, लिंगदीक्षा पुराण सोहळ्याच्या समाप्ती होणारं आहे. नंतर आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम. या सर्व कार्यक्रमांचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा, अशी विनंती स्वामीजीनी केली आहे.