ठळक बातम्याजिल्हा घडामोडी
मुंबई : घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग पडून ८ जणांचा मृत्यू ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई (प्रतिनिधी ) – राजधानी मुंबई येथे सोसाट्याच्या वारा आणि मुसळधार पावसाने आज दि.(13 मे) रोजी जोरात धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर घाटकोपर भागात पूर्व द्रुतगती मार्गावरील पेट्रोल पंपावर मोठा होर्डिंग कोसळला यामध्ये तब्बल आठ जणांचा बळी गेला आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
