बस प्रवासात एका महिलेचे दोन लाखांचे दागिने चोरीला ; अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
निगडी ( प्रतिनिधी) बस प्रवास करत असताना सिटाखाली ठेवलेल्या बागेतून महिलेचे 2 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.14) मलकापूर ते वल्लभनगर पिंपरी, एसटी बस मध्ये घडली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
याप्रकरणी महिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पिंपरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व त्यांचे पती हे मलकापूर ते वल्लभनगर पिंपरी असा एसटी बस प्रवास करत होते. यावेळी त्यांनी त्यांची बॅग हे त्यांच्या सीट खाली ठेवली होती. यावेळी कशाच्या तरी साहाय्याने बॅग कापून बॅगमधील 2 लाख 5 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरांनी चोरले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
पिंपरी येथे उतरल्यानंतर ही बाब लक्षात येताच फिर्यादीने पिंपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पिंपरी पोलीस चोराचा शोध घेत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)