Chinchwad : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू : चिंचवड येथील घटना
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
निगडी (प्रतिनिधी): जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या एम्पायर इस्टेट पुलाजवळ ऑटो क्लस्टरकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला उडवले. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघात झाल्यानंतर डंपरचालक पळून गेला. ही घटना गुरुवारी (दि. 16) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास घडली. योगेश श्रीकांत संगनोर (वय 27) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश हा दुचाकीवरून पिंपरी येथून निगडीच्या दिशेने जात होता. एम्पायर इस्टेट सोसायटीच्या पुलाजवळ तो ऑटो क्लस्टरकडे वळला असता भरधाव आलेल्या डंपरने योगेशच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकी डंपरच्या मागील चाकाखाली अडकली. डंपरखाली चिरडल्याने गंभीर जखमी झालेल्या योगेशचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पिंपरी पोलीस डंपरचालकाचा शोध घेत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)