बोरामणी एस. व्ही. सी. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावीचा निकाल ९९.३९ टक्के
सोलापूर (प्रतिनिधी): मार्च 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे घेण्यात आलेल्या एसएससी बोर्ड परीक्षेत प्रशालेने यशाची उज्वल परंपरा याही वर्षी कायम ठेवली. या शैक्षणिक वर्षात परीक्षेसाठी एकूण 165 विद्यार्थी परीक्षेत बसलेले होते त्यापैकी 164 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा एकूण निकाल 99.39% आहे.
यामध्ये 70 विद्यार्थी आणि प्रथम श्रेणीमध्ये 71 विद्यार्थी, द्वियीय श्रेणीमध्ये 21 विदयार्थी आणि ग्रेड श्रेणी मध्ये 2 विद्यार्थी उत्तीर्ण आहेत.प्रशालातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे
कु. रोकडे राजेश्वरी कमलाकर =90.60%
चि.पटेल अमन लतीफ =89.20%
कु.साखरे पुनम तानाजी =88.60%
प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष काशी जगद्गुरु ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी तथा संस्थेचे सचिव श्री शांतय्या स्वामी सर, संचालक श्री शशिकांत रामपुरे साहेब बोरेगाव प्रशालेचे मुख्याध्यापक श्री स्वामी सर तसेच बोरामणी गावचे ग्रामस्थ सरपंच श्री प्रकाश आवटे, श्री चन्नूमामा मटगे,श्री गौसभाई शेख, श्री शिवराज विभुते, श्री वैभव हलसगे, श्री पंडित अचलारे,श्री केदारलिंग विभूते आणि समस्त ग्रामस्थांनी मुख्याध्यापक श्री अतनुरे सर,पर्यवेक्षक श्री बिराजदार एस ए सर आणि सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.