Nigdi : निगडी प्राधिकरण येथे ज्वेलर्स दुकान फोडून ३० तोळे सोने तर १० किलो चांदी लंपास
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
निगडी (प्रतिनिधी): निगडी प्राधिकरण मधील सेक्टर 25 येथील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान फोडून, चोरट्यांनी दुकानातून 30 तोळे सोने, 10 किलो चांदी, 18 हजार रुपये रोख रक्कम आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला आहे. ही घटना शनिवारी (दि. 2) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
व्यापारी संदीप छगनराव बुहाडे (वय 50, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी संदीप बुहाडे यांचे प्राधिकरण निगडीमध्ये श्रीलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाचे शटर अर्धवट वाकवत उघडे करून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील तिजोरी तोडून 20 लाख रुपये किमतीचे 300 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच नऊ लाख रुपये किमतीचे 10 किलो चांदीचे दागिने, 18 हजारांची रोकड तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा एक हजार रुपये किमतीचा डीव्हीआर चोरून नेला. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कट करून नुकसान केले. तसेच फिर्यादी संदीप यांच्या दुकानाशेजारील इतर दुकानांचे सीसीटीव्ही देखील तोडून नुकसान केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)