ठळक बातम्या
Mumbai: ‘निर्धार एक हात आपुलकीचा’ संस्थेच्या वतीने जोगेश्वरी येथे रक्तदान शिबीर संपन्न

मुंबई (प्रतिनिधी- गणेश हिरवे): निवडणुकीची आचार संहिता, उन्हाचा तडाखा यामुळे दरवर्षी होतात तशी रक्तदान शिबिरे यंदा झाली नसल्याने सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.

असे असतानाही दिनांक 26 मे रोजी निर्धार एक हात आपुलकीचा संस्थेच्या वतीने जोगेश्वरी पूर्व येथील अरविंद शाळेत रक्तदान शिबिर संपन्न झाले.

यात एकूण 52 जणांनी यशस्वी रक्तदान केले.यावेळी महिला आणि नवोदित यांचा सहभाग उत्तम होता.एल आय सी मधून सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ मंडळ प्रबंधक डॉ तनुजा कुमार यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.यापुढे देखील अशी शिबिरे निर्धार नक्कीच आयोजित करेल असे यावेळी डॉ गिरीश महाजन यांनी सांगितले.
