ठळक बातम्या

वळसंग : श्री शंकरलिंग प्रशालेचा एसएससी निकाल ९५.१३%

वळसंग -ता. द सोलापूर येथील श्री शंकरलिंग प्रशालेचा एस.एस.सी.चा निकाल ९५.१३% लागला असून या परीक्षेत एकूण १४४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६२ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ४३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, आणि ३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत, असे एकूण १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रशालेत व सेमी माध्यमात कुमार प्रतीक इरेश ढब्बे यांनी ९५.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कुमार रोपेश भागण्णा घोडके यांनी ९०.००% टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी श्रुती सिद्धाराम घोडके हिने ९०.८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. सेमी वर्गाचा निकाल ९८.२७ टक्के लागला आहे.

मराठी माध्यमात कुमारी पल्लवी शीलवंत चौधरी हिने ८६.४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कुमार विश्वराज बसवराज भूसणगी याने ८३.२०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी अलिशा सैपन शेख हिने ८०.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविले आहेत. मराठी वर्गाचा निकाल ९३.५५% लागला आहे.

कन्नड माध्यमात कुमार समर्थ ईरणप्पा दुर्गे ९०.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कुमारी भवानी नागप्‍पा तिपरादी हिने ८९.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमार संपत शिवानंद मिसे यांनी ८८.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविले आहेत. कन्नड वर्गाचा निकाल ९१.६७% लागला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष श्रीशैल दुधगी चेअरमन शिवशरण थळंगे, रामेश्वर बिज्जरगी, विश्वनाथ थळंगे, शंकर केशेट्टी, सिद्धाराम बागलकोटी, चंद्रशेखर दसमाने, माजी प्राचार्य शिवशरण प्याटी, रमेश दूधगी, प्रकाश दुधगी, मल्लिनाथ थळंगे, संजय दुधगी, मुख्याध्यापक विरेश थळंगे, पर्यवेक्षक शिवानंद घोडके सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button