गावगाथा

बबलाद श्री चौडेश्वरी यात्रा महोत्सव ५ जून पासून प्रारंभ 

दि .5 ते 13 या कालावधित विविध धार्मिक कार्यक्रम

बबलाद श्री चौडेश्वरी यात्रा महोत्सव ५ जून पासून प्रारंभ 

मौजे बबलाद ता – अक्कलकोट येथे श्री चौडेश्वरी देवीची यात्रा आरंभ होऊन दि 13 जून 2024 रोजी कडी जत्रा असते. दि .5 ते 13 या कालावधित विविध धार्मिक कार्यक्रम होत असून त्या विधी कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत दि 5जून रोजी सकाळी 8 ते 11 या काळात चौडेश्वरी देवीस रुद्राभिषेक, जलाभिषेक प्रसाद वाटप व महामांगलारती . दुपारी 1.00 वा 05मि. देवी मुखदर्शन. रात्री 8 वा . भाग्यवंती देवी पुराण आरंभ, पुराणिक संगमेश शास्त्री कलबुर्गी तसेच संगीत सेवा विनोदकुमार दस्तापुर व सोमाशेखर कल्याणी यांचा तबला सेवा असणार आहे. रात्री 10 वा . पासून भजन कार्यक्रम असून पहाटे 3 वा. देवी बाळबट्टल कार्यक्रम होणार आहे. दी 6 जून अमावस्या असून सायंकाळी 6.10 मी. देविकडून कुंभ स्पर्श होऊन, ताक मंथन होणार आहे. दि 12 रात्री 9 वा पुराण समाप्ती व रात्री 10 वाजता लोणी येथील रुद्रमाहराज कंपनी कडून श्री कृष्ण पारिजात सादर होणार आहे. दि 13 जून रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून ओटी भरणे व भाशिंग चाढवणेचा कार्यक्रम होत असून दु.1.45 वा मानाचा ( शेवटचा) शासकीय भाशींग चढवण्याच कार्यक्रम असून त्या कार्यक्रमास शासन अधिकारी तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास बबलाद पंचक्रोशितील हजारो भाविक उपस्थित राहून देवी दर्शनाच लाभ घेतात. यात्रा काळात भक्तांकडून नित्य अन्नदान सेवा केली जाते. दि 11 जून रोजी सुहासिनिंचा ओटी भरणेचा कार्यक्रम श्री ष. ब्र. जयगुरूशांतलिंगाराध्य शिवाचार्य महस्वामिजी यांचा नेतृत्वाखाली होणार आहे. यात्रा काळात श्री ष. ब्र. गुरूशांतलिंग शिवाचार्य कल्लाहिपरगी, श्री म. नि. प्र. अभिनव बसवलिंग महस्वमिजी नागणासुर श्री. म. नि. प्र. बसवलींग महास्वमिजी अक्कलकोट तसेच पुज्य श्री धानय्या देवरू तिरुमलकोप्प यांची उपस्थिती असणार आहे तरी चौडेश्वरी भक्तांनी देवी दर्शन, पुराण श्रवण व प्रसाद सेवेचा लाभ घ्यावा असे यात्रा कमिटी अध्यक्ष शिवशरण लकाबशेट्टी कळवतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button