गावगाथा

शिक्षण निरीक्षक नवनाथ वणवे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त

सेवा निवृत्ती सोहळा

शिक्षण निरीक्षक नवनाथ वणवे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त

HTML img Tag Simply Easy Learning    

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

HTML img Tag Simply Easy Learning    

बृहन्मुंबई पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक नवनाथ वणवे सर हे नियत वयोमाना नुसार दिनांक ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले.जोगेश्वरी पूर्व अरविंद गंडभीर शाळेत त्यांचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.यावेळी त्यांचे मोठे बंधू आणि परिवारातील मुल जावई नातवंड तसेच शिक्षण विभाग पश्चिम कार्यालयाच्या शिक्षण उपनिरीक्षक लाठकर मॅडम, हेमलता गावित मॅडम, अधीक्षक महेश खामकर, धर्मेंद्र नाईक, नीता वैदू, सर्व कार्यालयीन कर्मचारी, उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक मुस्ताख शेख सर, माजी शिक्षण निरीक्षक नाईकवाडी सर, संचालिका नीता पाटील, ठाण्याचे उपशिक्षाधिकारी संदीप पाटील , सिंधुदुर्गचे उपशिक्षणाधिकारी मुक्तेश्वर छडिदार, अरविंद शाळेचे ट्रस्टी किरण कामत, अनेक मुख्याध्यापक, निमंत्रक आणि वणवे सरांचे शालेय कॉलेज जीवनातील अनेक मित्र पुणे बरमाती हून आणि पत्नी शीतल वणवे आणि इतर अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होत्या. ३५ वर्षात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली.घरची परिस्थिती गरीब होतीच. आई वडील अशिक्षित होते, ऊसतोडीचे काम करायचे अशावेळी मोठ्या भावाने पुढाकार घेऊन मला शिकविले व आज शिक्षणामुळे ऊसतोड कामगाराचा मुलगा शिक्षण निरीक्षक पदापर्यंत पोहचू शकला यामुळे माझ्या कुटुंबाला मी कधीच विसरू शकणार नसल्याचे वणवे आपल्या भाषणात म्हणाले तसेच त्यांनी कार्यालयातील कर्मचारी, मुख्याध्यापक आणि सर्वांचेच आभार मानले.यावेळी पश्चिम विभाग कार्यालय मार्फत त्यांना मानपत्र, प्रेमाची भेट आणि वणवे कुटुंबतील मुलांनी एकत्र येत नवीन बोलेरो गाडी भेट दिली.नोकरीत असतान कुटुंबाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळाला नसल्याने आणि अनेक कामे पेंडिग आहेत ती करायला प्राधान्य देणार असल्याची पुस्ती जोडली. आता निवृत्त झाल्याने पप्पा आमचे सोबत कायमच असतील, त्यांचा सहवास जास्त काळ आमचे साठी राहील कारण नोकरीत असताना त्यांच्या अनेकवेळा बदल्या होत होत्या. अशी मिश्किल टिप्पणी करत वणवे यांचे धाकटे चिरंजीव आकाश याने अगदी शेलकी शब्दात हलकं फुलकं भाषण करून कार्यक्रमात हास्यकल्लोळ निर्माण केला. सूत्र संचालन वैशाली काकडे व सुनील सागवेकर यांनी केलं.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button