गावगाथा

अवघड लिहिणार्‍यांना महान म्हणण्याची परंपरा रूढ होतेय

झांजर’ गुढीपाडवा विशेषांकाचे व ‘रँडम’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन डॉ. केशव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी देवा झिंजाड, सुनीताराजे पवार, दिनेश फडतरे उपस्थित होते.

अवघड लिहिणार्‍यांना महान म्हणण्याची परंपरा रूढ होतेय
पुणे : वाचकांना गृहित धरून अवघडातले अवघड लिहिणार्‍यांना महान म्हणण्यांची विचित्र परंपरा साहित्यात सुरू झाली आहे. ही परंपरा साहित्य व्यवहाराच्या ऊन्नतीसाठी योग्य नाही. असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. केशव देशमुख यांनी व्यक्त केले.
लेखक दिनेश फडतरे संपादित ‘झांजर’ या गुढीपाडवा विशेषांकाचे व ‘रँडम’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन डॉ. देशमुख यांच्या हस्ते नवी पेठेतील पत्रकार भवनात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन लेखक देवा झिंजाड, संस्कृती प्रकाशनाच्या प्रमुख सुनीताराजे पवार, लेखक दिनेश फडतरे उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, सर्व प्रकारचे लेखक लेखन करताना आपण कोणासाठी लिहित आहोत. आपला वाचकवर्ग कोण आहे. याचा विचारच करत नाहीत. खरे तर अवघड आणि बोजड लिहिण्यापेक्षा तेच लिखान साध्या, सरळ आणि सोप्या भाषेतही लिहिता येते. जे लिखान साधे, सोपे असते ते ह्दयाला अधिक भिडते. वाचकांना लेखक आपला वाटला पाहिजे. त्यामुळे लिखानाची क्रिया घडण्याआधी लेखकांनी वाचकांचा विचार करून लिहिले पाहिजे, असेही डॉ. केशव देशमुख यांनी सांगितले.
देवा झिंजाड म्हणाले, वाचन चळवळीला गती देण्यासाठी साधे-सोपे लिहिणारे लोक अधिक प्रमाणात लिहिते झाले पाहिजेत. बोजड साहित्यामुळे वाचक साहित्यापासूद दर चालले आहेत. चांगल्या साहित्याची निर्मिती करून वाचकांना साहित्याकडे वळविण्याचे काम लेखकांचे आहे. साहित्यात कंपूशाही आहे. कंपूशाहीमुळे बर्‍याच वेळा चांगली पुस्तके मागे पडतात. अस्सल साहित्यिक समाज माध्यमांवर सापडत नाहीत. समाज मादध्यमांवर लाईक्स, कमेंटवाल्याचा भरणार असल्याचेही देवा झिंजाड यांनी सांगितले.
सुनीताराजे पवार म्हणाल्या, लेखक तटस्तपणे भूमिका उभी करतो. ललित गद्य ही फार अवघड गोष्ट आहे. ललित गद्याचा विषय सहज सापडत नाही. पुस्तके ही आपली समृद्धी आहे. त्यामुळे पुस्तकांचे जतन झाले पाहिजे. दिनेश फडतरे यांनी प्रास्ताविक केले. वैशाली मोहिते यांनी सुत्रसंचालन केले. ऋचा बोंद्रे- पवार यांनी गायन सादर केले.
फोटो, इंटरनेट, देशमुख
ओळ : ‘झांजर’ गुढीपाडवा विशेषांकाचे व ‘रँडम’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन डॉ. केशव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी देवा झिंजाड, सुनीताराजे पवार, दिनेश फडतरे उपस्थित होते.
—————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button