“श्री रामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालयात वाचन दिन उपक्रम संपन्न”
वाचनाने मनाची प्रगल्भता सम्रुध्द बनते --------प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार

“श्री रामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालयात वाचन दिन उपक्रम संपन्न”
———————————————
वाचनाने मनाची प्रगल्भता सम्रुध्द बनते
——–प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार
श्री क्षेत्र तीर्थ(ता.द.सोलापूर) दि.२२ ग्रंथ वाचनामुळे मनाची व बुध्दिची प्रगल्भता वाढून वैचारिक बैठक प्राप्त होते. विचाराला दिशा मिळते वास्तव ,अवास्तव यातील अंतर कळायला लागते.म्हणून विद्यार्थ्यांनी मन लावून जाणीव पूर्वक वाचन करावे.त्यामुळे मांडणीतील भावार्थ कळतो.असे मननीय विचार संत साहित्याचे अभ्यासक प्रा डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी श्री रामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालय आयोजित राष्ट्रीय वाचन दिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मांडले.
संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि सोलापूर ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय तद्न्य पी एन.पणिकर यांच्या स्म्रुती प्रित्यर्थ राष्ट्रीय वाचन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथपाल काशिनाथ ऐवळे यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचे महत्व सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना गणेश थोरात यांनी विद्यार्थी दशेतील वाचनाचे महत्व अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.वाचनात सातत्य ठेवल्यास व्यक्तिमत्त्व प्रभावी बनते.असे स्पष्ट करुन वाचन दिन उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी सलग दोन तास वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिध्देश्वर घोंगडे यांनी केले. कार्यक्रमास वाचक विद्यार्थी उपस्थित होते.
